चंद्रपूर जिल्ह्यात झाडू यात्रेचे जंगी स्वागत

48

लढेंगे! जितेंगेच्या घोषणा.

चंद्रपूर

.         महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम वर्धा येथून आम आदमी पक्षाची विदर्भ झाडू यात्रेला प्रारंभ झाला. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा , अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि हिंगणघाट येथून ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होताच झाडू यात्रेचे जिल्हाचे प्रवेशद्वार खांबाडा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वरोरा आणि भद्रावती येथे जंगी स्वागत करण्यात आले.

.         यावेळी झाडू यात्रेचे जिल्हा संयोजक सुनील मुसळे आणि जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी स्वागत करीत वरोरा येथील सुरज शाहा यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. आनंदवन चौक, त्यानंतर हायवेने रत्नमाला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि नंदोरी येथे स्वागत झाले. भद्रावती येथे शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक यांच्या नेतृत्वात झाडू यात्रेची जोरदार स्वागत करण्यात आले. महिला आघाडी तर्फे बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार येथे स्वागत करण्यात आले. त्या नंतर नागमंदीर पर्यंत मिरवणुक काढण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व गांधी चौकात महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करण्यात आले. भद्रावतीची आराध्य दैवत भद्रनाग स्वामी मंदिर येथे राज्याच्या पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर जुना बस स्टॉप इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करून सभा घेण्यात आली. यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला नयना गंधम, सरिता ताजने, जगन पारखी व अनेक लोकांनी आम आदमी पार्टी मधे पक्ष प्रवेश घेतला. संचालन सोनल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार यांनी केले.