विवेकानंद महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शाळा संपन्न

72
भद्रावती
.         यशस्वी करिअर घडविण्यासाठी व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक असते. कठोर परिश्रम व अभ्यास करून जीवनात इच्छित ध्येय गाठता येते. व्यक्तिमत्व विकासातून जीवनात अनेक यशोशिखरे गाठता येतात. विद्यार्थी जीवनात जिद्द आणि चिकाटी सोडू नये यश आपोआप तुमच्या पायात लोळण घालेल असे विचार नागपूर येथील टीसीएस ट्रेनिंग ऑफिसर आनंद अकनुरवार यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शाळेच्या उद्घाटन समारंभात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
.         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. पुढे बोलताना अकनुरवार यांनी  टीसीएस च्या माध्यमातून विविध प्रकारचे करिअर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार रोजगार मार्गदर्शन विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर आस्टुनकर यांनी केले. संस्थाध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या करिअर मार्गदर्शन शाळेत  वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लाभ घेतला.