बाह्यसेवा यंत्रणे मार्फत कत्रांटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा काळा आदेश रद्द करा

42

शिक्षक भारती संघटना यांचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

भद्रावती

.           सरकारच्या उद्योग व कामगार विभागाने बाह्यसेवा यंत्रणे मार्फत कत्रांटी पद्धतीने शिक्षक व इतर कर्मचारी भरती करण्याचा आदेश काढला आहे.
.           या विरोधात शिक्षक भारती संघटना आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. शिक्षक भारती संघटना संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षक भारती संघटना चंद्रपूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फतने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून शासनाचा निषेध नोंदवून संताप व्यक्त करण्यात आला .
.           खाजगीकरण, कंत्राटीकरण याचे उदात्तीकरण करणारा व गुणवत्ताधारक आणि गरिब होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याने तो तात्काळ रद्ध करावा अन्यथा सर्व शिक्षक – कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्यभर सर्वसमावेशक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा शिक्षक भारती संघटना चंद्रपूर ने दिला आहे.
.           संघटनेतर्फे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. उद्योग व कामगार विभागाने शिक्षक व कर्मचारी भरती करून घेण्यासाठी नऊ बाह्यसेवा संस्थांची नियुक्ती केली आहे . या यंत्रणेकडून ठोक मानधनावर नियुक्ती केल्या जाणाऱ्या आहेत विशेषता यामध्ये कुशल, निमकुशल; अल्पकुशल व अकुशल असे भाग पाडून ठराविक मानधनावर नियुक्त्या केल्या जाणार आहे. शिक्षकांचा कुशल मनुष्य वर्गवारीत समावेश करून राज्यातील डीएड / बी.एड. सोबत टीईटी पात्रता धारक शिक्षकांची पदे खाजगी संस्थांच्या मार्फत भरली जाणार आहेत.

.           अनुभवी टीईटी पात्र शिक्षकांना प्रति महिना ३५ हजार रुपये तर सहाय्यक शिक्षकांना प्रतिमाह २५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे . हे सर्वस्वी संवैधानिक मूल्यांचा अवमान करणारे आहे. अशा खाजगी बाह्य सेवा संस्थांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या भरतीमुळे हुशार व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होणार आहे. बाह्यसंस्थांच्या माध्यमातून ठोक मानधनावर नियुक्ती करण्याचा आदेश काढून शिक्षण क्षेत्राची फसवणूक करत आहेत. सरकारने हा आदेश रद्द करावा व सध्याच्या पवित्र पोर्टल द्वारे भरतीच्या प्रचलित धोरणानुसार व प्रचलित वेतन श्रेणीनुसार या नियुक्त्या कराव्यात. अन्यथा राज्यभरातील सर्व संघटनांच्या वतीने सर्वसमावेशक व्यापक आंदोलन उभारून हे धोरण हाणून पडले जाईल, असा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे, या वेळी राज्य संयुक्त कार्यवाह राजेंद्र खेडीकर, जिल्हा अध्यक्ष भाष्कर बावनकर, डॉ. ज्ञानेश हटवार, विनोद पिसे, रवींद्र जेणेकर चंद्रपूर कार्यवाह, जिल्हा उपाध्यक्ष बडू बरडे, नानाजी सेलोकरं, सुरेश मडावी, संदिप ठावरी, एस. डी. गिरडे, एम. युव. युगे, मनोज डोंगरे कुमराज चौधरी आदी शिक्षक भारती चे पदाधिकारी उपस्थित होते.