प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ बारा बलुतेदारांनी घ्यावा- डॉ. अंकुश आगलावे

163

वरोरा:- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ बारा बलुतेदारांनी घेण्याचे आवाहन डॉ. अंकुश आगलावे यांनी एका प्रसिध्दीच्या माध्यमातुन केला आहे. ही केंद्रीय योजना पारंपारिक कारगिरांच्या मदतीसाठी असून यांचा लाभ बारा बलुतेदारातील कुटंूबास होणार आहे.

देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त देशात लागु होणार आहे. या योजनेव्दारे भारतीय समाजातील कारागीर मुर्तिकार यांना स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

या योजनेच्या लाभ समाजावून घेण्यासाठी वरोरा, भद्रावती शहर व ग्रामीण भागातील भाजपा पदाधिकारी यांनी योजना समजावून घेवून बारा बलुतेदार यांना एकत्र करून योजनेचे फायदे समजावून सांगण्याचे आवाहन डॉ. अंकुश आगलावे यांनी केले आहे.

या योजनेत 13000 करोड रूपयांची तरतुद केली असून 18 पारंपारिक व्यवसायांचा सहभाग आहे. प्रमाणपत्र आणि ओळखपत्राच्या सहायाने शिल्पकार आणि कारगिरांना मदत मिळणार असून पहिल्या टप्प्यात 1 लाख रूपयापर्यंत आणि दुस-या 2 लाखपर्यंत मदत फक्त 5 टक्के व्याजदराने मिळणार आहे. टुलकिट फायदा, डिजिटल व्यवहारासाठी इन्सेन्टिव्ह आणि मार्केटिंग सपोर्ट मिळणार आहे.

या योजेनचा फायदा सुतार, होडया बनवणारे, लोहार, कुलूप बनवणारे, हातोडा आणि टूलकिट बनवणारे, सोनार, कुंभार, मुर्तिकार, चांभार, मेस्त्री, चटई आणि झाडू बनविणारे, पारंपारिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी, माशांचे जाळे बनविणारे इत्यादींना लाभ मिळणार असल्याचे डॉ. आगलावे यांनी प्रसिंध्दीस सांगितले.