खुटाळा येथे अती पावसामुळे घराची पडझड, 

54
  • शासनाकडून मदतीची अपेक्षा
  1. नेरी,   तालुक्यातील सर्वत्र सुरू असलेल्या पावसाचा तडाखा कायम आहे, जोरदार पावसामुळे खुटाळा येथील एका घराची पडझड झाल्याने सदर कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे. येथील दुर्योधन डहारे यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय स्थिती झाली असून, ते कुटुंब खुप हालाकीचे जीवन जगत आहे. अचानक झालेल्या पाऊसाचे पाणी जास्त झाल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरले संपूर्ण घराची मुख्य भिंत कोसळली. घरातील कुटुंबीय या घटनेतून कसे बसे बचावले.

त्याच्या कुटुंबात सात सदस्य असून, घरातील परिस्थीती अत्यंत बिकट आणि दयनीय असल्यामुळे मोलमजुरी करून कसेबसे उदरनिर्वाह सुरू आहे. दरवर्षी पावसाचे पाणी घरात शिरते. संपूर्ण घरात ओलावा असल्याने, पोथडे हाथरून हे कुटुंब जीवन जगत आहे. अशा बिकट परिस्थितीत निसर्गाचा फटका बसला.

सदर कुटुंब अनेक वर्षांपासून घरकुलच्या प्रतीक्षेत आहे. प्रपत्र ‘ड’ घरकुल यादीत नाव असूनही, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुल मंजूर होत नाही आहे. त्यामुळे या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. शासनाचा कोणताही कर्मचारी अधिकारी यांनी आमच्याकडे विचारपुससुद्धा केली नाही, असा आरोप त्यांनी केला. तरी शासनाने आम्हाला मदत करावी. अशी मागणी दुर्योधन डहारे यांनी केली आहे.

—————————————-

कुटुंबाला त्वरित मदत मिळावी

सदर कुटुंब अनेक वर्षांपासून घरकुलच्या प्रतीक्षेत असून, घरात हलाकीचे जीवन जगत आहे. गावात असे अनेक कुटुंब आहेत ज्यांना घरकुल ची अत्यंत गरज आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वंचित राहावे लागते. ज्या कुटुंबाला आधीच घरकुल चे लाभ मिळाले आहे त्या कुटुंबात परत दोन,तीन घरकुल मंजूर होतात. मात्र, ज्या कुटुंबाला खरच घरकुल आवश्यक आहे असे लाभार्थी अजूनही वंचित असून, प्रतीक्षेत आहेत. अश्या कुटुंबाना शासनाने घरकुल मंजूर करून, त्वरित मदत करावी.

शुभम बारसागडे , युवा सामाजिक कार्यकर्ता