केंद्रिय सहकारी पैक्स कर्मचारी संघटनेची दिल्लीत बैठक

39

नेरी

.           शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांचे जीवनमान उचवण्याठी धडपळ करणाऱ्या सहकारी विवीध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्याची संघटना केंद्रीय सहकारी पॅक्स कर्मचारी संघ यांची सभा नुकतीच शहीद भगतसिंग भवन पहाडगंज नवी दिल्ली येथे संपन्न झाली.

.           या सभेच्या वेळी देशभरातून 17 राज्याचे प्रतिनीधी व पदाधिकारी उपस्थिती होते. ही सभा राजेश दत्ता (झारखंड) यांचे अध्यकषतेखाली घेण्यात आली. या सभेत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगीरथ माकडे यांची संघटन मंत्री या पदावर निवड करण्यात आली. यावेळी राज्य संघटनेच्या वतीने रवींद्र काळे, सुनील कापसे, लालचंद गणवीर मोरेश्वर घरजारे, वासुदेव पांचभाई, अशोक सोजे, बालाजी पोजदर यांनी अभिनंदन केले.
या सभेत दिवसेंदिवस सहकारी संस्थांवर शासनाने काढलेले अध्यादेश , सहकारी संस्थेच्या अडचणी, याबाबत चर्चा करून सहकरी संस्थांच्या अडचणींबाबत शासनाकडे विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात असल्याची माहिती देण्यात आली. व लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणी च्या माध्यमातून सहकारी संस्थेचा अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा सहकारी संस्था कमचारी संघटना अध्यक्ष हेमंत लोधे (कोरपना) उपाध्यक्ष मंगेश मस्के (चिमूर) सदस्य पंकज रणदिवे (चिमूर), प्रशांत ठावरी, उपाध्यक्ष चिमूर, विनोद बारसागडे यांनी दिली.