डॉक्टर आणि रुग्ण यांचा दुवा म्हणजे फार्मासिस्ट – डॉ पंकज भिवटे

40

वरोरा

.          फार्मासिस्ट दिनानिमित्य शेगांव फार्मासिस्ट असोसियशन तर्फे आयोजित कार्यक्रमाला जिल्हा सचिव अजिंक्य ठाकरे, कार्यकारणी सदस्य तथा भाजपा फार्मासिस्ट असोसिशन सहसंयोजक मनोज सराफ, अफरोज खान, संजय मोहता, असोसियशन अध्यक्ष गजानन भिवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

.         यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला.  भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य डॉ. पंकज भिवटे यांनी फार्मिस्टटचे महत्व समाजामध्ये कोरोना काळामध्ये सर्वांना कळाले व खरं तर फार्मासिस्ट डॉक्टर व रुग्णा मधला खरा दुवा आहे. त्यानी अश्याच प्रकारे सेवा दयावी व प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रामुळे खरं तर समाजातील उपेक्षित घटकांना सर्वात जास्त लाभ झाला व कोरोना काळामध्ये केंद्र सरकार ने केलेल्या मदतीमुळे त्यामध्ये राशन लस व विमा कवच दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद व्यक्त केले, शेगांव मध्ये तब्बल 100 फार्मासिस्ट यांच्या उपस्थित पार पाडतो हे कोचीत च ठिकाणी पाहायला मिळते. सर्वांनी या गोष्टी चा आदर्श घेण्यासारखे आहे. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा सचिव अजिंक्य ठाकरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन असोसियशन चे अध्यक्ष गजानन भिवटे यांनी व्यक्त केले.