रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनाथ वरोऱ्यात एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन

29

 

वरोरा

.        राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे या भूमिपुत्राने ११ सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले.मात्र त्यांची प्रकृती आंदोलन दरम्यान खालवली.आजघडीला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी वरोरा येथील तहसील कार्यालय समोर एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

.        यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सोबत इतर सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. तब्बल १५ दिवसा नंतर देखील न्याय हक्कांसाठी ओबीसींचा एल्गार सुरु आहे. मात्र राज्यकर्ते ओबीसींच्या आंदोलनाकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

.        ओबीसींच्या आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये,मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा,बिहार राज्याच्या धर्तीवर ओबीसींची जात निहाय जणगनना करावी, ओबीसींना सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणाऱ्या योजना लागू करावी,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह सुरु करावे,आदी न्याय मागण्यांचे निवेदन वरोरा येथील तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

.        यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाला ज्या प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्र्यांनी झुकते माप दिले.त्या तुलनेत ओबीसींच्या आंदोलनाबाबत दुजाभाव केला आहे.याचा धिक्कार ओबीसींच्या आंदोलनकर्त्यांनी केला.मराठा आंदोलनाला सहानुभुति दर्शविणारे राज्यकर्ते ओबीसींच्या आंदोलनासंदर्भात दुजाभाव करत असल्याची भावना आंदोलनकर्त्यात व्यक्त केली जात आहे.

.        या आंदोलनात जयंत टेमुर्डे, अविनाश ढेंगळे, नरेंद्र धांडे, राष्ट्रीय ओबीसी क्रांती दल च्या विदर्भ अध्यक्ष रंजना पारशीवे सह मोठया प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी झाले होते.