हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या आरोपीस न्यायालयाने ठोठावली १० वर्ष कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड

32

 

चंद्रपुर

हुंड्यासाठी पत्नीला वारंवार त्रास देत असल्याने अखेर पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने दोन्ही मुलांसह मालडोंगरी शिवारातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती . आरोपी विरुद्ध ब्रम्हपुरी पोलिसांनी दोषारोप सादर केले असता न्यायालयाने आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.

पोलीससूत्रांनुसार फिर्यादीच्या मुलीचे लग्न आरोपी रवींद्र मुरलीधर पारधी यांचे सोबत सन २००८ मध्ये झाले. लग्नानंतर आरोपी काही दिवस चांगला राहिला. त्यानंतर त्याला दारू पिण्याची सवय लागल्याने तो मृतकाकडे पैशाची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास झगडा भांडण करून चारित्र्यावर संशय घेत होता. याला कंटाळून अखेर पत्नीने दोन्ही मुलांसह मालडोंगरी शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . याची तक्रार मुलीच्या वडिलांनी ब्रम्हपुरी पोलिसात दिली . शहर पोलीस ठाणे ब्रह्मपुरी येथे अप क्रमांक 17/2022 कलम 498 (अ), 306 भा. द. वी. नुसार आरोपी रवींद्र मुरलीधर पारधी (४२) यांचे विरुद्ध गुन्ह्या दाखल करून अटक करण्यात आली . आरोपी रवींद्र मुरलीधर पारधी राहणार मालाडोंगरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यास न्यायालयात हाजर केले . न्यायालयाचे सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 चंद्रपूर यांनी साक्षीदार तपासले व योग्य पुरावाच्या आधारे दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी आरोपी नामे रवींद्र मुरलीधर पारधी यास कलम 498 ( अ ) भादवी. मध्ये ३ वर्ष शिक्षा पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा. कलम 306 भादवी. मध्ये १० वर्षे शिक्षा पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा कलम 235 (2) सीआरपीसी. नुसार ठोठावली.
सदर गुन्ह्याचा तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे ब्रह्मपुरी, सरकार तर्फे अॅडव्होकेट संदीप नागपुरे चंद्रपूर, आणि कोर्ट पैरवी म्हणून पोहवा. रामदास कोरे ,नापोअ. विजय ब्राह्मणे पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांनी काम पाहिले.