रवींद्र टोंगे यांच्या ओबीसी आंदोलनाला शिवसेना (उबाठा ) जिल्हाप्रमुखाचा पाठिंबा 

56

वरोरा :

.           मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ठ करू नये यासह विविध मागण्याकरिता ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करीत आहे. त्यांच्या या आंदोलनाला शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला

.            ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबर पासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये , बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय सर्वे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे वसतिगृह सुरु करून स्वाधार योजना लागू करावी व विविध मागण्यांकरीता अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या या मागण्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी पाठिंबा दर्शवत आंदोलन स्थळी भेट दिली व पाठिंबा दिला. तसेच संपूर्ण शिवसेना परिवार आपल्या पाठीशी उभा आहे अशी शाश्वती दिली. यावेळी जेष्ठ शिवसैनिक बंडू डाखरे उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड , युवासेना जिल्हा समन्वयक दिनेश यादव, शहर प्रमुख संदीप मेश्राम , उपशहर प्रमुख मनीष दोहतरे,शिवदूत मेघश्याम शेंडे व आदी शिवसैनिक उपस्तिथ होते.