सरकारच्या चुकीमुळे अपात्र ठरलेल्या लोकांची घरकुले त्वरित मंजूर व्हावी 

81

  •  काँग्रेस चे नेरी शिरपूर जि. प. सर्कल प्रमुख विलास     पिसे यांची मागणी 

प्रतिनिधी. नेरी 

भारत सरकार यांच्या वतीने आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला मागेल त्याला 2023 पर्यंत घर मिळून देऊ, अशी संकल्पना अशी घोषणा केली.त्यानंतर नेरी ग्राम पंचायत येथील 900 लोकांची ड वर्गाच्या घरांची सर्वे करून नेरी ग्राम पंचायत यांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन मंजुरी करता यादी संबंधित विभागाला पाठवण्यात आली.या सर्व यादिस मंजुरी मिळून पात्र सर्व लोकांकडून आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स मागण्यात आल्या. परंतु या 900 पैकी 84 लोकांना या यादीतून सरकारच्या चुकीमुळे ऑनलाइन सिस्टम मधून रिजेक्ट बाय सिस्टम जनरेट अपात्र म्हणून झाली. अशी अनेक आपल्या संपूर्ण चिमूर तालुक्यातील अंदाजे चार ते पाच हजार लोकांची नावे सरकारच्या चुकीमुळे वगळण्यात आली. याविषयी माहिती संबंधित डिपार्टमेंट विभागाला दिली असता परत ही नावे मंजुरीकरता पाठवण्यात आली, तसा ठराव सुद्धा संबंधित विभाग यांना देण्यात आला परंतु अजून पर्यंत या यादीला मंजुरी मिळाली नाही. या विषयीची चौकशी विचारपूस संबंधित अधिकारी यांना केली असता ,आम्ही यावर काहीच करू शकत नाही जे ड वर्गातील इतर मागासवर्गीय एसटी एनटी लोकांचे नाव शबरी आवास योजनेत समाविष्ट करावे असे सांगितले परंतु ओबीसी लोकांना आम्ही कुठेच समाविष्ट करू शकत नाही ते पंतप्रधान आवास योजना यांना मान्यता मिळेल तेव्हाच घरकुल मिळेल ,असे सांगितले जे गोरगरीब कुटुंब आपले नाव आज उद्याला येईल असे स्वप्न बाळगून आहे त्यांचे घर पडले आहे, ज्यांना घराची गरज आहे म्हणून सतत आँफिस मध्ये चकरा मारीत आहे.अशा लोकांची यादीत नाव आहे पण या योजनेपासून सरकारच्या चुकीच्या सिस्टम मुळे पंतप्रधान आवास योजनेचे स्वप्न भंग झाले करिता आपण संबंधित या विभागाचे आमदार ,अधिकारी यांनी ,त्वरित या 84 सिस्टम जनरेट अपात्र ठरलेल्या लोकांच्या या दीस त्वरित मंजुरी मिळवून, घरकुल पात्र यादीत समाविष्ट करून त्यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी नेरी शिरपूर जि. प. सर्कल प्रमुख विलास पिसे काँग्रेस यांनी केली आहे.