रात्र जागून गोंदेडा वाशियानी आवळल्या रेती तस्करांच्या मुसक्या 

61
  • पोलीस पाटील तमुस अध्यक्ष सहितगावकऱ्यांनी मध्यरात्री चार ट्रकटर केले जप्त
  • विना नंबरचे तीन ट्रकटर ट्राली सहित व एक नांगरटी लावलेले ट्रकटर पकडले

प्रतिनिधी नेरी,

चिमूर तालुक्यात बाराही महिने रेतीची तस्करी सुरू असते मात्र महसूल विभाग दुर्लक्ष करीत असतो ही नेहमीची बाब लक्षात घेता गोंदेडा ग्रामवाशियानी स्वत पुढाकार घेऊन महसूल विभागाची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन स्वतः रात्र जागून दि 24 ला मध्यरात्री च्या सुमारास नंबर नसलेले ट्राली सहित तीन ट्रकटर व एक विना ट्रालीचे नांगरटी लावलेले असे चार ट्रकटर ग्रामवाशीयांनी उमा नदीवरील रेती घाटावर पकडले रेतीतस्करांनी तात्काळ ट्राली तील रेती खाली केली मात्र गावकरी यांनी चारही ट्रकटर पकडून ग्रामपंचायत कार्यालयात जमा केले आणि त्यांच्या चाब्या काडून ठेवून ग्रा प कार्यालयाला समोरील गेट ला कुलूप लावीत रेती तस्करी करनाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या

सविस्तर असे की गोंदेडा येथील उमा नदीवर रेतीची तस्करी रात्रीच्या अंधारात होते याची जाणीव गावकऱ्यां होती त्यांनी अनेकदा महसूल विभागाला सूचना केल्या मात्र दुर्लक्ष होताना दिसतात दि 24 च्या मध्यरात्री गावकरी एकत्र आले आणि स्वतः पुढाकार घेऊन तस्करांना पकडण्याचे एकमताने ठरविले आणि मध्यरात्री च्या सुमारास चार ट्रकटर पकडले आणि ग्रा प कार्यालयात जमा करीत कुलूप लावून जप्त केल्या महसूल विभागाच्या भ्रमणध्वनी वरून माहिती दिली मात्र कुणीही न आल्याने रात्री दोन वाजता पोलिसांना कळविण्यात आले तेव्हा तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर बाबतीत महसूल विभागाला माहिती द्या असे सांगून चौकशी केली त्यानंतर सकाळी आर आय मंडल अधिकारी टिळक ,तलाठी राठोड मडम आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले मौका चौकशी करून पंचनामा केला मात्र नागरिकांनी कोणती कारवाई करणार याबद्दल विचारले असता महसूल विभाग उत्तरे देण्याच्या स्थितीत नसल्याचे नागरिकांना सांगितले त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता तेव्हा अधिकारी निघून गेले यानंतर जिल्ह्यातील महसूल विभागाला माहिती देण्यात आली तेव्हा दुपारी महसूल विभाग चे अधिकारी आणि पोलीस यांच्या देखरेखीखाली चारही ट्रकटर तहसिल कार्यालयात जमा करण्यासाठी नेण्यात आले अशी माहिती गावकऱ्यांनी दिली असून गावकऱ्यांनी सक्त कारवाई करण्यात यावी असे अधिकाऱ्याकडून हमी घेऊन त्यांच्याकडे ट्रकटर देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे सदर तीन ट्रकटर पिपरडा येथील गेडाम यांच्या मालकीचे तर एक ट्रकटर नेरी येथील ननावरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे तेव्हा सदर ट्रकटर वर नंबर नसल्याने पोलीस विभागाने मोटार अधिनियम कायद्यानुसार कारवाई करावी तसेच महसूल विभागाने जप्तीची दंडात्मक कारवाई करून ट्रकटर मालकावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून महसूल विभाग कोणती कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे मात्र कुठलीही कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना सांगितले