नागपूर विभागीय उपाध्यक्षपदी कवी,नीरज आत्राम,यांची निवड 

108

 

चंद्रपूर –              काव्यप्रेमी शिक्षक मंच ही नोंदणीकृत साहित्य क्षेत्राला वाहिलेली संस्था आहे.महाराष्ट्रातील शिक्षक यांच्यातील सुप्तगुण,व कलेला वाव देण्यासाठी अग्रेसर आहे.नवोदित कवी,लेखकांना प्रोत्साहन देऊन विचारपीठ निर्माण करण्याचा उदात्त हेतू आहे.शिक्षकांमध्ये असलेला कवीमन बाहेर काढण्याचे कार्य काव्यप्रेमी शिक्षक मंचद्वारे केल्या जाते.नुकतेच काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर विभागाच्या उपाध्यक्षपदी कवी,नीरज आत्राम यांची निवड काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके , व राज्य सचिव कालिदास चवडेकर यांनी केलेली आहे.

कवी,नीरज आत्राम वरोरा जि.चंद्रपूर यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक,साहित्यिक, सामाजिक अश्या सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.