स्वातंत्रदिनी अमलनाला धरणात युवकाचा बुडून मृत्यू 

72

 

  • अतिउत्साह बेतला जिवावर

गडचांदूर

सकाळी स्वातंत्र्य दिन साजरा करून दिवसभर मौज मस्ती करण्यासाठी चंद्रपुरातील काही युवक कोरपणा तालुक्यातील अमलनाला धरण पाहण्यासाठी गेले . यातील एका युवकाने अती उत्साहात येऊन अमलनाला धरणातील वेस्ट वेअर मध्ये पोहण्यासाठी उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज आल्या नसल्याने त्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली . शुभम शंकर चिंचोळकर (३२) राहणार चंद्रपुर असे मृतक युवकाचे नाव आहे .

चंद्रपुर जिल्हात अनेक ठिकाणी धबधबे व डॅम आहे . त्यातील अमलनाला धरण पर्यटकांना भुरळ घालत आहे . सलग सुट्ट्या आल्या की नागरिक खास करून युवा पिढी सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी काना कोपर्‍यातून अमलनाला धरण पाहण्यासाठी येतात . मात्र यातील काही युवक अती उत्साहीत होऊन धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरतात मात्र अधिक पाणी असल्याने आता पर्यन्त अनेक युवकांचा या धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे . असाच प्रकार स्वातंत्र दिनाची सुट्टी असल्याने चंद्रपुर शहरलगत असलेल्या दाताळा येथील काही युवक अमलनाला धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. यातील शुभम चिंचोळकर नावाचा युवक अती उत्साहीत होत अमलनाला धरणातील वेस्ट वेअर च्या पाण्यात पोहण्यासाठी उडी घेतली मात्र पाणी अधिक असल्याने तो पाण्यात बुडू लागला . हे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी शुभम ला वाचवा अशी आरडा ओरड केली मात्र पाणी अधिक असल्याने पाण्यात उतरण्याची कोणीही हिमत केली नाही . उपस्थितांनी गडचांदूर पोलिसांना तक्रार दाखल केली . गडचांदूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून युवकाची शोध मोहीम सुरू केली . काही वेळात पोलिसांनी शुभम चा मृतदेह बाहेर काढला, स्वातंत्र्य दिनी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

मागील वर्षी याच ठिकाणी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. नेहमी या ठिकाणी अपघात घडत असतांनाही अनेक युवक रिस्क घेत जीव गमवताना दिसत आहे . दैनिक नवजीवन ने मागील वर्षी अमलनाला धरणा बाबत बातम्या प्रकाशित करून जनजागृती केली होती . हे मात्र विशेष