वरोरा तहसील कार्यालयात ” महसूल सप्ताह ” साजरा

117

 वरोरा

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाअधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरकिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोभाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षा, १ ऑगस्ट महसूल दिनापासून  “महसूल सप्ताह”  साजरा करण्यात आला .

वरोरा तहसील कार्यालय येथे “महसूल सप्ताह”  निमित्ताने  १ ऑगष्ट़  ला महसुल दिन साजरा करण्यात आला  २ ऑगष्ट़  ला “युवा संवाद”, ३ ऑगष्ट़ ला “एक हात मदतीचा”, ४ ऑगष्ट़ ला“जनसंवाद”, ५ ऑगष्ट़ ला “सैनिक हो तुमच्यासाठी”, ६ ऑगष्ट़ ला “महसुल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त़ कर्मचारी यांचेशी संवाद” तसेच ७ ऑगष्ट़ ला “महसुल सप्ताहाचे सांगता कार्यक्रम” घेण्यात आला .

लोकमान्य़ कनिष्ठ़ महाविदयालय वरोरा येथे तहसील कार्यालय वरोरा मार्फत “युवा संवाद” कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.  तहसीलदार योगेश कौटकर, वरोरा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन मतदार यादीत नाव नोंदणी करणे, नावात दुरुस्ती करणे संबधाने माहीती दिली. तसेच ऑनलाईन पध्दतीने मतदार नाव नोंदणी कशाप्रकारे करावी याकरीता Voter Helpline App याबाबत मार्गदर्शन केले.    उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापूरे, वरोरा यांनी  ई पीक पाहणी App बददल तसेच मतदान नोंदणीचे अनुषंगाने विद्यार्थ्याशी संवाद साधुन आपले घरी, आपले गावात कोणताही १८ वर्षावरील युवक मतदार नोंदणी पासुन वंचीत राहु नये या संबधाने मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाकरीता उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापूर वरोरा,  तहसिलदार योगेश कौटकर वरोरा,  राखे ,  नायब तहसिलदार काळे तसेच  निखाडे  प्रामुख्याने उपस्थित होते.