चिमुर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात नागभिड, ब्रम्हपूरी,सिन्देवाही, सावली या तालुक्याचा समावेश करू नये.

116
  • जलसमाधी आंदोलन प्रशाशनाने रोखले:
  • दोन तासा रास्तारोको आंदोलन:
नागभीड: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड ब्रम्हपूरी सिन्देवाही सावली या तालुक्याचा शासनाने नुकताच चिमुर जिल्हाधिकारी कार्यालयाल क्षेत्रात समावेश केल्याने त्यांच्या विरोधात आज घोडाझरी तलावामध्ये जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान आज दुपारी १२वाजतापासुन आंदोलन कर्ते घोडाझरी तलावांचे मुख्य प्रवेश व्दाराजवळ एकत्र आले. मात्र या आंदोलनाला पोलिस प्रशान व तहसिल प्रशाशनाने नागभिड- तळोधी या प्रमुख महामार्गावर असलेल्या घोडाझरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन रोखून धरल्याने येथे काही वेळ तनाव निर्मान झाला होता. मात्र आंदोलकाना प्रशासन जुमानत नव्हते. आणी शेवटी आंदोलकानी आक्रमक भुमिका घेवून प्रशाशनाचे विरोधात नारेबाजी करून निषेध करत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले यामुळे वाहतूक एक किलोमिटर पर्यंत थांबुन होती..या वेळी प्रशाशन मुर्दा…..चे नारे देऊन चिमुर चे आमदारांचा ही निषेध करण्यात आला.
या आंदोलनामध्ये तिन्ही तालुक्यातील सष़र्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. नागभीडचे तहसिलदार यांना यावेळी निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता करण्यांत आली.