वरोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टराची लेटलतीफशाही

57

डॉक्टराच्या लेटलतीफशाहीपणामुळे बाल रुग्ण तातकळत

उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची मनमर्जीपणाचा कळस

ओम चावरे  नवामार्ग न्युज नेटवर्क 

वरोरा : वरोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या लेटलतीफशाहीने कळस गाठला आहे.डॉक्टरांची ओपीडी नऊ वाजता सुरू होणार या आशेने चार पाच महिन्याच्या बाळाला घेऊन माता डॉक्टरांच्या प्रतीक्षेत तासन तास बाल बाह्यरुग्ण विभागाच्या बाहेर उभे राहतात मात्र रुग्णालयातील डॉक्टर प्रत्येक दिवशी दोन दोन तास उशिरा येतात.डॉक्टरांच्या मनमर्जी पणामुळे लहान लहान बालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा हे डॉक्टर ऐकत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर आता दाद कुणाला मागावी असा प्रश्न उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बाल रुग्णांना पडला आहे.

वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला असतो.या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर नेहमी लेटलतीफशाही साठी प्रसिद्ध आहे.या लेटलतीफशाहीपणाचा भुर्दंड बाल रुग्णांना सुद्धा सोसावा लागत आहे. नवजात बालकांना तपासणीसाठी दोन दोन तास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते.या रुग्णालयात लेटलतीफशाही ही एक दोन दिवसांचा आजार नसून कित्येक महिन्यापासून हा आजार सुरू आहे.वरिष्ठ अधिकारी यांनी कित्येकदा या डॉक्टरांना समज दिली मात्र त्यांच्या प्रयत्नांना अजून पर्यंत यश आलेले नाही ही सुद्धा वास्तविकता आहे.सकाळी नऊ वाजता ओपीडी सुरू होत असते.बाल रुग्ण नऊ वाजेपासून ओपीडीच्या दरवाज्यावर तातकडत डॉक्टराची वाट बघत उभे असतात मात्र डॉक्टर आपल्या नित्यनियमाप्रमाणे दोन दोन तास उशिरा येतात.अश्या डॉक्टरावर अंकुश आणण्यासाठी जन प्रतिनिधी सुद्धा पुढे येतांना दिसत नाही हे विशेष.

 

मी कित्तेकदा समज दिली मात्र फरक पडत नाही

 मी त्या डॉक्टराला कित्येकदा समज दिली.मात्र त्यांच्या वागणुकीत काडीचाही फरक पडत नाही.रोज बाल रुग्ण डॉक्टराची वाट बघत असते यामुळे मला ही मनस्ताप होतो.कित्येक वेळा मी त्यांची ओपीडी सांभाळते पण त्यांना काहीच फरक पडत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.

डॉ.खुजे

सब डिव्हिजन हेल्थ ऑफिसर

उपजिल्हा रुग्णालय वरोरा