किशोर टोंगे यांचे शिष्टमंडळ सोयाबीनची झाडे घेऊन उपविभागीय कार्यालयात धडकले

36

वरोरा
.          वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकावर आलेल्या रोगामुळे पीक हे पूर्णता पिवळे पडून वाळायला लागले आहे. शासनाने तात्काळ सोयाबीन पिकांचा सर्वे करून शेतकर्यांूना मदत करावी यासाठी चक्क सोयाबीन चे झाडे घेऊन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते किशोर टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्टमंडळ बुधवारी उपविभागीय कार्यालयात धडकले.
.          मागील चार पाच वर्षापासून कापूस या पिकाला बोन्डअळी चा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन पिकांची लागवड मोठया प्रमाणात केली असून सोयाबीन चे चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु अती पावसामुळे अनेक प्रकारचे रोग सोयाबीन वर येऊ लागले आणि सोयाबीन हे पीक होतेचे नव्हते करून गेले त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून तो प्रशासनाची मदत मिळेल या आशेवर आहे.
.          यासाठी किशोर टोंगे यांच्या शिष्ट मंडळाने शासनाने प्रति एकरी तात्काळ ५१ हजार रुपये अशी मदत जाहीर करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत निवेदन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
यावेळी शिष्ट मंडळात युवा कार्यकर्ता शुभम आमने, बंडू वरारकर, शुभम पिजदूरकर, साहिल मोडक, प्रवीण बदखल, यश आवारी, विजय चिकटे,कौशल कुमरे, वृषीकेश धानोरकर, मयूर पिजदुरकर,आकाश तुरारे, इ. उपस्थित होते.