नेरी येथे आ. बंटी भांगडीया यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

38

अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांची प्रमुख उपस्थिती

गणेश चतुर्थी निमित्य महाराष्ट्र शासनाचा आनंदाचा शिधा वाटप

नेरी
.         राज्यातील महायुती सरकारने स्वत धान्य दुकानातुन आनंदाचा शिधा या उपक्रमातून डाळ, साखर, रवा, पामतेल या वस्तू असलेल्या किट चे वितरण शिधापत्रिका धारक गोर गरीब जनतेला वितरित करण्यात येत असून नेरी येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते दि 20 सप्टेंबर ला वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार भांगडिया यांनी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनेची माहिती देऊन प्रत्येकांनी कागदपत्रे सादर करून योजनांचे लाभ घ्यावा असे आवाहन केले
.         या कार्यक्रमा ला अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे, जेष्ठ भाजपा नेते डॉ श्याम हटवादे, उपाध्यक्ष ओबीसी विभाग राजू देवतळे, तालुका अध्यक्ष राजू झाडे, भाजपा सहकार आघाडी दत्तू पिसे, प्रदेश सचिव मनीष तुम्पलीवार, ओबीसी तालुका आघाडी एकनाथ थुटे, महिला अध्यक्ष माया ननावरे,सरपंच ग्रामपंचायत नेरी रेखा पिसे, संदीप पिसे जी, प. प्रमुख पिंटू खाटीक सदस्य ग्रा प, नरेंद्र पंधरे शहर अध्यक्ष दिनकर शिनगारे, उपसभापती बाजार समिती तथा अध्यक्ष नेरी प्रायमरी क्रेडिट सहकारी संस्था रवींद्र पंधरे, शेतकरी नेते काशिनाथ चांदेकर,अन्न पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, गुरू पिसे आदी मान्यवर उपस्थित होते
.         सदर कार्यक्रमाचे संचालन रमेश बोलधने यांनी केले तर प्रास्तविक अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांनी केले तर आभार सूरज तिडके यांनी मानले या कार्यक्रमाला अनेक महिला पुरुष शिधापत्रिका धारक , भाजपा कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते