कुटुंब हितासाठी महिलांची धडपड

59
  •  सण उत्सवात महिला फळांची दुकाने सांभाळत आहेत.

महेंद्र कोवले
सिंदेवाही
उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा, या तीनही ऋतू मध्ये कष्ट करून आपल्या कुटुंबाची आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टकरी महिला दिवसभर राब राब राबत आहेत. सध्या सण उत्सवाचे दिवसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी महिला फळ आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करताना दिसून येत आहेत. कोरोणा काळात सामान्य नागरिकांची परिस्थिती हालाखीची झाली असताना अनेक महिलांनी फळ विक्री, भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला होता. तोच व्यवसाय अनेक महिला उत्साहाने सांभाळताना दिसून येत आहेत.
आपल्या घरी मदत व्हावी या उद्देशाने शहरातून बाहेर निघणाऱ्या प्रत्येक मार्गावर बसस्थानक, दवाखाने, इत्यादी ठिकाणी महिलांचे फळ विक्रीचे दुकान आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काही महिला हातगाडी चालवत फळ विक्री, भाजीपाला विक्री करून आपल्या संसाराला हातभार लावत असल्याचे दिसून येत आहे. अनेक महिला दिवसभर राब राब राबून जेमतेम पैसे मिळतात. मात्र या महागाईच्या काळात त्यांना जीवन जगणेही अत्यंत कठीण झाले आहे. आपले जीवन कष्टात घातले. परंतु आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी त्यांची रोजची धडपड सुरू आहे. कुटुंबासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या अन्नासाठी त्यांची दिवसभर भटकंती सुरू असते. महिला शेतातील बहुतेक कामे पार पाडत असतात. शेतीचा डोलारा जणू तिच्या श्रम शक्तीवरच उभा झालेला आहे. महिलांची कुटुंबासाठी चाललेली धडपड ही प्रेरणादायी ठरत आहे.