विजेत्या चिमुकल्यांच्या आनंदात वाहतूक कंट्रोलरने पाडले विरजण 

11

चिमुकल्या खेळाडूंना चक्क बस मधून खाली उतरविले

एसटी कर्मचार्‍यांचा प्रताप

वरोरा : तालुका स्तरीय 14 वर्षांखालील  खो -खो सामन्यात चिमुकले जिंकले. ही आनंदाची बातमी घरच्यांना भेटून प्रत्यक्षात सांगू म्हणून घराकडे जाण्याची ओढ. गावाकडे जाणार्‍या बस मध्ये चिमुकले बसले मात्र अचानक एस टी कर्मचारयाने सर्व चिमुकल्याला बस मधून उतरविले. आणि चिमुकल्यांच्या आनंदात विरजण पडले. हा प्रकार वरोरा बसस्थानकावर गुरुवारी सायंकाळी घडला.

तालुका स्तरीय विनर टीम

.      वरोरा शहरातील तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे 14 वर्षांखालील खो -खो क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा खेमजईच्या मुलीच्या संघाने 14 वर्षांखालील खो -खो गटात प्रथम क्रमांक पटकावला.  हा आनंदाचा क्षण आणि या आनंदात सर्व खेळाडू मुली आणि मुले परत खेमजईला जाण्यासाठी बसस्थानकावर पोहचले. जिंकण्याचा आनंद मनात बाळगून आपण लवकर घरी जाऊ आणि आपल्या आईवडिलांना ही गोड बातमी सांगु अशा आविर्भावात मुले मुली होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद पाहावासा वाटत होता. सगळे पाच वाजेपासून ज्या बसची वाट पाहत होतो ती आली. मुले आनंदाने त्या बसमध्ये चढले. त्यांच्या मोठ्या बहिणीही बसमध्येच होत्या. हे सर्व भाऊ आणि बहिणी त्यांच्या जवळ दाटीवाटीने बसले. परंतु अचानक कंडक्टर उतरले आणि चौकशी अधिकारी म्हणा किंवा वाहतूक कंट्रोलर म्हणा त्यांना घेऊन आले. आणि सर्व लहान मुली -मुलांना बसमधून खाली उतरवले. त्यानंतर सर्व मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद आनंदच राहिला  त्यांच्या मोठ्या बहीणी बसमध्ये आणि लहान भाऊ -बहिणी घाबरून खाली उभे. विचार करा. मुलांना काय वाटत असेल? जिंकल्याचा आनंद नष्ट होऊन मुलांच्या मनात भिती निर्माण झाली.

.      साधी माणुसकी यां महामंडळ एस टी कर्मचार्‍यांना कळू नये याचे आश्चर्य वाटते. सर्व मुले -मुली बसल्यावर बसमध्ये जागा शिल्लक होती. त्यां चा बहाणा असा होता की आम्ही हे लहान मुले मुली घेतले तर आनंदवन चौकात, टेमुर्डा येथील मुलांना कसे न्यायचे. म्हणजे काय तर जेथून बस सुटते तेथील लहान मुले मुली तेथेच ठेवायचे, ते लहान आहेत, दिवसभर खेळून थकले असावेत, त्यांना भूक लागली असावी असा कींचीतही विचार यांच्या मनात येवू नये याचे आश्चर्य वाटते. उलट लहान मुली मुलांना बसस्थानकावर केविलवाणी चेहरा करुन बसले. हा कोणता मानव विकास म्हणायचा? मानव विकास अंतर्गत या बसेस सुरू आहेत. खेड्यापाड्यातील मुलेमुली शिकले पाहिजेत. शिक्षणातून आधुनिकतेची कास धरली पाहिजे. उच्च शिक्षणाची टक्केवारी वाढली पाहिजे. शिकणाऱ्या मुलामुलींना सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून शासन करत आहे.

.      पण त्याच मानव विकासच्या बसमधून चिमुकल्या मुलामुलींना जबरदस्तीने खाली उतरवणारी अशा मानसिकतेचे माणसे काय मानव विकास करणार आहे. ही मुलेमुली काही रिकामी फिरायला नव्हती आली. ही सर्व मुलेमुली तालुका स्तरीय खो-खो क्रिडा स्पर्धा खेळण्यासाठी आले होते. ह्या सुद्धा शासनाच्या वतीने आयोजित क्रिडा स्पर्धा होत्या. म्हणजे ते शाळेचेच विद्यार्थी होते.वर्षातून फार तर एकदोनदा असे मुले आणण्याचा प्रसंग येतो. त्यामुळे अशा निर्दयी, कठोर, जुलमी, पाषाण हृदयी, भावनाशून्य माणसिकतेचा शिक्षकांकडून  जाहीर निषेध करण्यात आला.