ग्रा. पं. काजळसर च्या वतीने स्वच्छता ही सेवा व माझी वसुंधरा उपक्रम सोहळा

7

नेरी : चिमुर तालुक्यातील काजळसर येथे दि. 19 सप्टेंबर ला ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता ही सेवा व माझी वसुंधरा हा उपक्रम सोहळा राबविण्यात आला. सदर उपक्रमात ग्रा पं सर्व पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पंचायत समिती चिमूर चे स्वच्छता विभागाचे अधिकारी गावकरी मोट्या संख्येनी उपस्थित होते.

.       देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रम संपुर्ण देशात साजरे करण्याचे संकल्प जाहीर केला. दि 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यत हा उपक्रम संपूर्ण देशात स्वच्छता करून राबविला जात आहे. त्या अनुषंगाने काजळसर येथे दि 19 सप्टेंबर ला स्वच्छता ही सेवा व माझी वसुंधरा उपक्रम मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या तालुक्यात आजारांनी थैमान मांडले आहे. डासांमुळे अनेक आजार होत असल्याने ग्रा प काजळसर व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली तसेच रिकाम्या जागी साचलेल्या पाणी सुद्धा स्वच्छ करण्यात येऊन खडडे बुजविण्यात आले संपुर्ण परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला स्वच्छता हिच निरोगी राहण्याची चावी आहे असा संदेश आरोग्य विभागाने दिला.

.       यावेळी या कार्यक्रमाला सरपंच आशिष हरीदास नन्नावरे, उपसरपंच  अशोक खोब्रागडे, अर्चना गळमडे, नेहा सामुसाकडे, नलिना वाटगुरे सर्व सदस्य गावकरी व ग्रा. प.कर्मचारी तसेच सामुदाय आरोग्य अधिकारी छाया राठोड, आरोग्य सेवक किष्णा राठोड, अंगणवाडी सेविका.पाटील, गायत्री बोरकर,  सिआरपी रजना नाकाडे, गितांजली मेश्राम,  चिमूर प.स.मधुन तालुका समन्वय.रामटेके, धुर्वे, कापगते, राऊत उपस्थित होते.