वायफळ बोलणाऱ्या नेत्यावर कारवाई कधी होणार ?

34

खासदारांनी संसदेत प्रश्न मांडावे

नागभिडातील सामाजिक कार्यकर्त्यांचे खासदारांना निवेदन

नागभीड : पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसात दुष्कृत्यांचा आलेख वाढतच चाललेला आहे. नाशिक चे रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मो. पैगंबर यांच्या वर आक्षेपार्ह विधान करणे. नितेश राणे हे मुस्लिम समाजाला चिथावणीखोर भाषेत बोलतात मस्जिद मध्ये घुसून मारण्याची भाषा बोलणे आणि तरीही राज्याचे गृहमंत्री कोणतीच कारवाही करताना दिसत नाही.

.       बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात संशयास्पद रित्या पडला हे निंदनीय आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदिप धनकड यांचे हस्ते आभासी पद्धतीने केले. सविधान सोबत मंदिर शब्द जोडणे संविधानाचा घोर अपमान आहे. संविधान कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार करीत नसताना मंदिर हा शब्द एका धर्माला इगित करतो तो शब्द काढून टाकण्यात यावा ही मागणी भारतीय म्हणून आम्ही करतो. राज्य सरकार मनुवादी विचाराचे असल्याचे निदर्शनास दाखवून दिले. मनुस्मृती नुसार चार वर्ण ब्राम्हण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. ब्राम्हण सांगेल ते सर्वांनी करणे, शूद्रांना शिक्षणाचा, धन संचय करण्याचा अधिकार नव्हता. संविधान मंदिर स्थापन करून हे मनुवादी सरकर संविधानाला मंदिरात ठेवणार. मग पुजारी म्हणून ब्राम्हण च राहील कारण पुजारी पद 100 टक्के ब्राम्हणांसाठी आरक्षित राहील. आणि ते सांगतील सविधनात काय आहे काय नाही.

.       संविधानाबद्दल आमचे ओबीसी मराठा एससी एसटी मुस्लिम भाऊबंद जागरूक झाले आणि आपले हक्क मागत आहेत. संविधान बद लवता येत नाही तर पूर्णपणे बळकावणे हा उद्देश दिसत आहे त्यासाठी चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांना वरील सर्व घटनांवर संसदेत प्रश्न मांडावेत म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना चंदन वामनराव कोसे, भीमराव बुधाजी खोब्रागडे, सचिन खोब्रागडे, ज्ञानेश्वर डांगे, सागर विजय कोसे उपस्थित होते.