जुनोना येथे अल्पवयीन मुलाकडून तलवार जप्त

20

बल्लारपूर पोलिसांची कारवाई 

आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल

विसापूर : अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जन उत्सव चंद्रपूर तालुक्यातील जुनोना गावात केले जात होते. त्या दरम्यान बल्लारपूर पोलीस कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी हजर होते. त्यावेळी पोलिसांना अल्पवयीन बालक गणपती विसर्जन दरम्यान घातपात करून दहशत निर्माण करणार आहे. या माहितीच्या आधारे त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याचे कडून धारदार तलवार पोलिसांनी जप्त केली. बल्लारपूर पोलिसांनी ही कारवाई मंगळवार (दि. १७) सप्टेंबर रोजी केली. याप्रकरणी पोलिसांनी आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.       चंद्रपूर तालुक्यातील आणि बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनोना गाव आहे. हे गाव तलावामुळे पर्यटन स्थळ आहे. जवळपासचे पर्यटक येथे पर्यटनाला येतात. याच गावात गणपती विसर्जनच्या दिवशी बल्लारपूर पोलीस बंदोबस्तासाठी आले होते. पोलिसांना एक विधी संघर्ष बालक दहशत निर्माण करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्या बालकाला ताब्यात घेतले. त्याच्या वडीलांना सोबत घेऊन पोलिसांनी घराची झडती घेतली.

.       त्यावेळी त्याच्या घरातील बांबू मचानीवर लाल रंगाच्या म्यान मध्ये लोखंडी धारदार तलवार शस्त्र आढळून आले. ही तलवार पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी अल्पवयीन बालकावर आर्म अॅक्ट कायद्यान्वये कलम ४, २५ भारतीय हत्यार बंध नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, उपनिरीक्षक हुसेन शाह, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, लखन चव्हाण, मिलींद आत्राम, खंडेराव माने यांनी केली.