बल्लारपूर औधोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे उदघाटन

14

उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांनी आभासी पद्धतीने केले लोकार्पण

मान्यवरांनी मनोगतातून केला संविधानाचा जागर

विसापूर : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून भारताला कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे. युवकांना कौशल्य विकास करता यावा. यातून आत्मनिर्भर आणि रोजगाराची संधी मिळण्याची संधी मिळावी. या अनुषंगाने राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने बल्लारपूर येथील औधोगिक प्रशिक्षण संस्थत रविवार (दि. १५) सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता संविधान मंदिराचे उदघाटन सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने हा लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगतातून संविधान जागर केला.

.        राज्याचे कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४3४ औधोगिक प्रशिक्षण संस्थेत एकाचवेळी सदर कार्यक्रम घेण्यात आला. बल्लारपूर औधोगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. यावेळी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. सत्यपाल कातकर, ॲड. वैशाली टोंगे, डॉ. माधुरी उराडे, प्राचार्य प्रशांत दोंतुलवार, प्राचार्य बि. के. लांडे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, एस. के. बारके, कवि सुनील बावणे, ॲड. मनोज कवाडे, गट निर्देशक संध्या कळस्कर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भटवलकर यांची उपस्थिती होती.

.        भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी शिक्षण घेतलेल्या मुंबई येथील एल्फिन्स्टन औधोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या हस्ते झाल्यानंतर बल्लारपूर येथील औधोगिक प्रशिक्षण संस्थेत फित कापून, दिप प्रज्वलित व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मालार्पण करून मान्यवरांनी संविधान मंदिराचे लोकार्पण केले. यावेळी मान्यवरांनी भारतीय संविधान देशाचा आरसा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याची संकल्पना संविधानात आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस कठोर मेहनतीने संविधानाचा मसुदा तयार केला. २६ नोव्हेंबर १९४९रोजी हा संविधानाचा मसुदा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे कडे सादर केला. या संविधानाची देशात अंमलबजावणी २६ जानेवारी १९५0 पासून सुरु आहे. मात्र, आजघडीला संविधानात्मक बाबीवर आघात होत आहे. याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्व भारतीयांनी घेण्याची गरज आहे, असे मनोगतातून मान्यवरांनी केली.

.        दरम्यान औधोगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करुन संविधानाचे महत्व विषद केले. यावेळी प्राचार्य आर. बी.वानखेडे यांच्या हस्ते डॉ. सत्यपाल कातकर, डॉ. माधुरी खोब्रागडे यांचा स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायत्री जावळकर यांनी केले. संचालन आर.जी.काळे यांनी केले, तर आभार रत्नाकर खोब्रागडे यांनी मानले. यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, पालक, समाजसेवक व औधोगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.