सिंदेवाहीच्या नगराध्यक्षपदी भाष्कर नन्नावार तर उपाध्यक्षा पूजा रामटेके अविरोध

19

सिंदेवाही : नगरपंचायत कार्यालय सिंदेवाही – लोनवाही येथील नगराध्यक्ष, आणि उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यामुळे वरील दोन्ही पदाची शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष म्हणून भाष्कर श्रावण नन्नावार तर उपाध्यक्षा म्हणून पूजा विलास रामटेके यांची अविरोध निवड झाली असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

.        सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायत मध्ये १७ नगरसेवक असून सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२२ मध्ये पार पडली होती. यामध्ये कांग्रेस पक्षाने १४ जागेवर विजय मिळवून निर्विवाद बहुमत प्राप्त केले होते. नगराध्यक्ष इतर मागास प्रवर्गाकरिता राखीव असल्याने स्वप्नील कावळे यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली होती. तर उपाध्यक्ष म्हणून मयूर सूचक यांची निवड करण्यात आली होती. मात्र अडिज वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच तत्कालीन नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, तसेच उपाध्यक्ष मयूर सूचक यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे दोन्ही पदे रिक्त झाली होती. दरम्यान शुक्रवारी नगरपंचायत कार्यालय येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली. नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी १-१- नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले असल्याने दोन्ही पदाची निवड अविरोध करण्यात आली असल्याची पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी घोषणा केली.यामध्ये नगराध्यक्षपदी भाष्कर नन्नावार तर उपाध्यक्षपदी पूजा विलास रामटेके यांची अविरोध निवड झाली आहे.

.        सहायक अधिकारी म्हणून राहुल कांकाळ, उपस्थित होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच उपाध्यक्षा यांचे सिंदेवाही – लोनवाही शहरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.