नागपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपीला नेरी येथे अटक

21

चिमुर पोलिसांची कामगिरी

नेरी : पंधरा दिवसांपासून नागपूर पोलिसांना हुलकावणी देणारा नागपूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मोठ्या शिताफीने चिमूर पोलीसांनी दि. 9 सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपीला नेरी येथून ताब्यात घेतले.

.      प्राप्त माहिती नुसार नागपूर येथील रहिवासी पालाश उर्फ काल्या हा नागपुर येथे घडलेल्या हत्या कांडाच्या घटनेत सहभागी होता. त्याचे विरुद्ध नागपुर पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.  गुन्हा नोंद होताच तो पसार झाला. अनेक दिवसापासून फरार झालेला काल्या चिमुर तालुक्यातील नेरी येथे बुरड मोहल्ला नेताजी वार्ड क्रमांक 5 मधील एका महिलेच्या घरी दडून असल्याची गुप्त माहिती चिमूर पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे दि. 9 सप्टेंबर चे सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास चिमूर पोलिसांनी ताफ्यासह नेरी येथील सदर महिलेच्या घरी धडक दिली. यावेळी पोलिसांनी महिलेला विचारणा केली असता घरात कुणीच नाही अशी खोटी माहिती दिली. मात्र पोलिसांना विश्वसनीय माहिती असल्याने त्यांनी घराचा तपास घेतला घरात कुणीच भेटले नाही. त्यामुळे काही पोलिस अधिकारी हे घराच्या वर पाण्याचे टाकी कडे गेले तर तिथे कुणी लपून बसल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी टाकी उघडून बघितली असता सदर गुन्हेगार त्याच टाकी मध्ये दिसला.

.      पोलिसांनी त्याला अटक करून विचारपुस केली असता ती महिला त्याची पत्नी असल्याची कबुली त्याने दिली. ही धडक मोहीम चिमूर पोलीस ठाणेदार संतोष बाकल, पोलीस उपनिरीक्षक अजय चौधरी, पोलीस हवालदार विलास निमगडे, सचिन खमनकर,  महिला पोलीस शिपाई मयुरी कोराम गावकरी यांचे सहकार्याने करण्यात आली. व आरोपीला अटक केल्याने परिसातील नागरिकांनी सुद्धा निःश्वास घेतला. सदर आरोपी पकडल्या नंतर चिमूर पोलीस स्टेशनमध्ये आणून नागपूर येथील अजनी पोलीस स्टेशन ला माहिती देऊन आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.