स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर साहित्य अध्यासन समितीवर प्रा डॉ किरण बोरकर यांची निवड 

17

मुल : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकतीच स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर साहित्य अध्यासन समितीची स्थापना करण्यात आली, सदर समितीद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अध्ययन करण्यात येणार आहे, सदर समितीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सहायक प्रा. डॉ. किरण बोरकर- कापगते यांची निवड झाली आहे.

.     प्रा. किरण कापगते ह्या स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर फौंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करतात, सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार, यश बांगडे, गुरुदास कामडी, प्रा धर्मेंद्र मूनघाटे,डॉ संजय गोरे, संजय रामगिरीवार, प्राचार्य धनंजय गहाने, अरुंधती कावडकर, डॉ विद्याधर भाई यांच्या सोबत प्रा किरण बोरकर-कापगते यांना या समितीचे कार्य करायचे आहे, यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.