शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र बोरकर तर उपाध्यक्ष अस्मिता रामटेके

38

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वासेरा येथे नुकतीच नव्याने शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष म्हणून रवींद्र बोरकर यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अस्मिता प्रवीण रामटेके यांना विराजमान करण्यात आले.

.       शाळेसंबंधीच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत तथा शाळेचे प्रशासन व्यवस्थित चालविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचा पुढाकार महत्वाचा असतो, यासाठी शासन स्तरावरून परिपत्रक काढून शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी निवड करून शाळा व्यवस्थापन समिती तयार करण्यात येते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वासेरा येथे नुकतेच पालक सभा आयोजित करून नव्याने शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले.

.       यामध्ये अध्यक्ष म्हणून रवींद्र राजेश्वर बोरकर, उपाध्यक्ष अस्मिता प्रवीण रामटेके, तर सदस्य म्हणून देशपाल सूर्यभान कोवले, महेंद्र दामोधर आत्राम, राजेंद्र गुरुदास मेश्राम, गंगाधर श्रीनिवास आनंदे, संजय मारोती आत्राम, मीना दीपक बोरकर, मंजुषा किशोर मेश्राम, मेघा अशोक पेंदाम, सुशीला सुनील घोनमोडे, गीता सुकरू मेश्राम, तर स्वीकृत सदस्य म्हणून शशांक भोजराज रामटेके यांची निवड करण्यात आली. या दरम्यानची सर्व प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक विलास डांगे यांनी पार पाडली आहे.