अडेगाव (को) मार्गाची दुरवस्था

14

तात्काळ दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी

नेरी : नेरीवरून जवळ असलेल्या अडेगाव (को) गावाला जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी गिट्टी उखळून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरण फुटून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तात्काळ मार्गाची चौकशी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती करून मार्ग तयार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

.       अडेगाव हा गाव जंगलाच्या कडेला बोथली काजळसर गावाच्या मधात टोकावर असलेले गाव असून या गावात हिंस्त्र पशूंचे वावर असलेले छोटेशे गाव आहे. या गावात जाण्यासाठी एकच मार्ग असून तो मार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. जागोजागी खडे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्यातील गिट्टी उसळली असल्याने रहदारी कशी करावी. हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या अश्या प्रकारच्या दुरावस्थेमुळे अपघात सुद्धा होऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा या मार्गाबद्दल प्रशासनाला अर्ज निवेदने देऊनही संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा रस्ता निर्माण करणाऱ्या संबंधित विभागाला सुद्धा या रस्त्याची अवदशा सांगितले असून विनवणी केली आहे. मात्र अजूनही कोणी या मार्गाकडे लक्ष दिले नाही. तेव्हा संबंधित विभागाने व प्रशासनाने या मार्गाची तात्काळ कारवाई करून मार्ग तयार करावा. अशी मागणी दीपक झोडे कांग्रेस प स प्रमुख व ग्रामस्थांनी केली आहे.