कवितेच्या घराचे राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर

17

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते ५ आक्टोंबरला पुरस्कारांचे वितरण

चंद्रपूर : सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय असलेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात नवनव्या व वैशिष्ट्यपूर्ण अशा उपक्रमांची भर पडत आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव (बु), ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरात महाराष्ट्रातील बालसाहित्यिकांच्या दर्जेदार बालसाहित्याचा सन्मान होणार आहे. या सन्मानार्थ चार पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये बापुराव पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (प्रथम ३००० रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र) विजय जोशी, डोंबिवली यांच्या टोपीवाले फुगे या बालकवितासंग्रहाला, बापुराव पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (द्वितीय २००० रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र) – मंदा नांदुरकर, अचलपूर यांच्या फुलकई या पुस्तकाला, तर बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (तृतीय – १००० रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) – गणेश भाकरे, सावनेर, नागपूर यांच्या ताई माझी आई या संग्रहाला, तसेच बापुराव पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (चतुर्थ १००० रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र) – प्रतिभा जगदाळे, सांगली यांच्या हसरी शाळा या संग्रहाला जाहीर झाला आहे. ५ आक्टोबर २०२४ रोजी कवितेचे घर, शेगांव (बु), ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, मुंबई यांच्या हस्ते हे चारही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

.        पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांनी आपले बालसाहित्य पाठवले होते, त्यातून हे पुरस्कार जाहीर केल्याची माहिती दिनांक 7 सप्टेंबरला बापुराव पेटकर ह्यांच्या जन्म दिवशी श्रीकांत पेटकर, कल्याण (संस्थापक), किशोर पेटकर, नागपूर (संकल्पनाकार), डॉ. प्रमोद नारायणे, वर्धा (कार्यवाह), डॉ. संदीप भेले, बदलापूर (कार्यक्रम समन्वयक), सूर्यकांत पाटील, वरोरा (प्रसिद्धी प्रमुख) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.