बनावट सातबारा तयार करून सहकारी संस्थेचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न

27

कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तलाठ्याने केली तक्रार

संजय खाडिलकर यांच्यावर गुन्हा दाखल

कोठारी : विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.कोठारी च्या मालकीची जागा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे. अनेक वर्षापासून ही जागा रिकामी होती. या जागेवर एकाने अतिक्रमण केले. व बनावट सातबारा तयार करून सहकारी संस्थेचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संजय वामन खाडिलकर यांच्यावर कोठारी पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.कोठारीचे तलाठी राजेश आकोजवार यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

.       प्राप्त माहिती नुसार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.कोठारी र.नं ७४४ संस्थेनी रामदास श्रीनिवास मोरे यांचे कडून सन १९६१ ला मौजा कोठारी सर्व्हे नं १, आराजी ०.०३ जागा खरेदी केली होती. सदर जागा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असून अनेक वर्षापासून रिकामी होती. या जागेवर संजय खाडिलकर यांची नजर गेली व सदर भूखंड हडपण्याकरिता जागेवर अतिक्रमण करून स्वतःच्या नावाचा बोर्ड लावला होता. संस्थेने याची तक्रार संबंधित विभागाकडे करीत अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. मा.उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बल्लारपूर आदेश क. फौ. मा. क. ०१/२०२१/ कलम १४५/४४५ दि. १३/६/२०२२ रोजी आदेश पारीत करण्यात आला. तहसीलदार बल्लारपूर यांचे पत्र क. /कावि / महसुल सहा. / प्रस्तु. -१/ तह.२०२२/१३०२ दि.५/७/२०२२ अन्वये तहसीलदार यांच्या उपस्थितीत संजय वामन खाडिलकर यांच्या नावाचा बोर्ड हटविण्याबाबत पोलीस स्टेशन कोठारी यांनी १२/७/२०२२ ला पोलीस बंदोबस्तात तसेच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यवाही केली होती.

.       उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेशा विरुद्ध जिल्हा न्यायाधिश -१ व अतिरिक्त सत्र न्यायालय. चंद्रपूर येथे फौजदारी रिव्हजन न. ३९/२०२२ अन्वये संजय वामन खाडिलकर यांचेकडून अपील घेण्यात अली. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे इस्तेगाशा क्र. ०१/२०२१ कलम १४५ जा .फौ. प्रकरणामध्ये खाडिलकर यांनी ७/१२ सादर केला आहे. तो बनावट असल्याचा मंडळ अधिकारी,तहसीलदार यांच्या अहवालानुसार उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बल्लारपूर यांनी या बाबत पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा आदेश तहसीलदार यांना दिला. तहसीलदार यांचे पत्र क. प्रस्तु. /६/८/२०२४ ला तक्रार दाखल करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून कोठारीचे तलाठी यांची नेमणूक केली.

.       तलाठी कार्यालय कोठारी यांनी दिनांक २/९/२०२४ ला पोलीस स्टेशन कोठारी येथे बनावट सात-बारा संदर्भात तक्रार दाखल केली. कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार खरसान यांनी संजय वामन खाडिलकर यांच्या वर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८,३३६(३) व कलम ३४० अन्वये गुन्हा दाखल केलाआहे.बनावट सातबारा तयार करून सहकारी संस्थेचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय वामन खाडिलकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सहकारी संस्थेचे अध्यक्ष गुरुदेवबुरांडे,उपाध्यक्ष गोपाल बोभाटे, व्यवस्थापक किशोर बुटले,सोमेश्वर पदमगिरीवार, चंद्रकांत गुरू,राजकुमार परेकर,ऋषीदेव वासाडे यांचेसह संचालक मंडळाने मागणी केली आहे.