भद्रावतीत शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंती निमित्त स्नेह मिलन सोहळा

19

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचा स्तुत्य उपक्रम

भद्रावती : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या माध्यमातून दि. ५ सप्टेंबर ला स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंतीच्या निमित्ताने सेवानिवृत्त, कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला.

.      या सोहळ्याला उद्घाटक स्वरूपात बळवंतदादा गुंडावार, सह-उद्घाटक माजी मुख्याध्यापक मदनराव ठेंगणे, तसेच सोहळ्याचे अध्यक्ष आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू तर प्रमुख अतिथी म्हणून  ऍड. पुरुषोत्तम सातपुते, माजी मुख्याध्यापक भाऊराव कुटेमाटे, माजी मुख्याद्यापिका चंद्रकला पारोधे, चंपत आस्वले,  रामभाऊ पारधी,  विठ्ठल हनवते,  देहारकार,  पुरुषोत्तम मत्ते,  कोरडे,  अण्णा नवघरे, जांभुळकर, वैद्य, माजी नगरसेवक नंदू पढाल, सुधीर सातपुते, किसन माटे तसेच ट्रस्टचे अध्यक्ष धनराज आस्वले तथा ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे उपस्थित होते.

.      उपस्थित मंडळींनी त्यांच्या आयुष्यभरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाला मनोगतातून वाट मोकळी करुन दिली. याप्रसंगी ‘जीवनात काय कमावले, काय गमावले, काय घडवले व सद्यस्थितीत काय सुरू आहे, या विषयावर मंडळींनी मनोगत व्यक्त केले.

.      कार्यक्रमाचे संचालन मंगेश भोयर यांनी केले तर प्रास्ताविक रविंद्र शिंदे यांनी केले. सोहळ्याला सरकारी अधिकारी, सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.