कोठारीत रानटी डुक्कराचा दोघांवर हल्ला

7

कोठारी : वनपरिक्षेत्र कोठारी नियत क्षेत्र कोठारी येथे दि. २९ ऑगस्ट गुरुवारला वेगवेगळ्या ठिकाणी रानटी डुक्कराने गावात प्रवेश करून दोघांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.

.     सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रभूदास विठू खोब्रागडे (८०) घरून बांगडे राईस मिलकडे गेले असता रानटी डुक्कराने अचानक त्यांचेवर हल्ला करन गंभीर जखमी केले व मोक्यावरून पळ काढला. जखमीस गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी येथे उपचारार्थ भरती केले असता पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.

.     या प्रकाराची माहिती वनविभागाला समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे यांचे मार्गदर्शनात क्षेत्रसहाय्यक पी सी पेदापल्लीवार, वनरक्षक सिद्धार्थ कांबळे मोक्यावर जाऊन पंचनामा केला. व जखमींची भेट घेऊन तपासणी केली.
त्यानंतर संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान शांताबाई विठ्ठल सलामे (७०) आपल्या घराबाहेर रस्त्यावर निघाली असता रानटी डुकराने अचानक धडक दिली त्यात ती जखमी झाली.जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले.वन विभागाला घटना समजताच जखमींची भेट घेतली व मोका पंचनामा करण्यात आला.

.     रानटी हिंस्र स्वापदे गावात शिरकाव करून एकाच दिवशी दोघांवर हल्ला करून जखमी केल्याने दहशत निर्माण झाली आहे. सकाळी व संध्याकाळी वयोवृद्ध, महिला, तरुण, बालके फिरायला बाहेर जात असतात त्यांचे जीवाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने त्यावर त्वरित बंदोबस्त करून प्रतिबंध करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.