“वारी प्रबोधनाची” रथयात्रेची नंदोरीत उत्साहात सांगता

130
मार्गदर्शन करताना नरेंद्र जिवतोडे व उपस्थित गुरुदेव भक्त.
  •  भद्रावती तालुक्यातील 105 गावांमध्ये प्रबोधन

भद्रावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकात्मता व संघटनेची शक्ती वाढविण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेली “वारी प्रबोधनाची” रथयात्रा अखेर 11 दिवसांच्या प्रवासानंतर नंदोरी येथे 23 ऑगस्टला उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.

.           “वारी प्रबोधनाची” या यात्रेची सुरुवात 13 ऑगस्ट 2024 रोजी भद्रावतीतील भद्रनाग मंदिरातून झाली. या प्रबोधन वारीने सलग 11 दिवसांमध्ये 105 गावांना भेट दिली, ज्यात अनेक सेवाभावी लोकांनी तन, मन, धन अर्पण करून सहकार्य केले. नंदोरी येथील ग्रामस्थांनी रथयात्रेचे भव्य आणि दिव्य स्वागत केले. सामुदायिक प्रार्थनेने समारोप कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक राष्ट्रीय कीर्तनकार इंजि. भाऊसाहेब थुटे, श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक रविदादा मानव, शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाचे युवा प्रबोधनकार राजदादा घुमनर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यानंतर सप्तखंजिरी वादक उदयपाल महाराज वानिकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला, ज्याला प्रचंड संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. या यात्रेदरम्यान, प्रबोधन वारीने तालुक्यातील 105 गावांमध्ये विविध प्रबोधन कार्ये केली. यात ग्रामगीता प्रणित आदर्श ग्राम निर्मिती, श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना, आणि बंद पडलेल्या सामुदायिक प्रार्थनांचा पुनरारंभ यांचा समावेश होता. अनेक गावांमध्ये तरुणांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. तसेच, ग्रामसभेचे प्रात्यक्षिक दाखवून आणि अधिकारांची जाणीव करून देण्यात आली. दुर्गम भागातील गावांमध्ये विविध योजनांची माहिती पोहोचवली गेली, त्यामुळे त्या गावातील लोकांशी संवाद साधण्यात आला.

.          यात्रेत मार्गदर्शन करणारे प्रमुख व्यक्ती म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक राष्ट्रीय कीर्तनकार इंजि. भाऊसाहेब थुटे, रविदादा मानव, नरेंद्र जीवतोडे, राजदादा घुमनर, प्रज्वल टोंगे, प्रदीप चौधरी, दीपक नरताम, . सुवर्णा प्रकाश पिंपळकर, मधुकर बांदुरकर, मुरकुटे, नामदेव आसवले, एकनाथ चिकटे, आणि इतर कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या वारीला सहकार्य केले. गुरुदेव भक्तांच्या अथक परिश्रमांमुळे या प्रबोधन वारीने सामाजिक एकात्मता आणि संघटनेची शक्ती वाढवली आहे. भद्रावती तालुक्याच्या 11 दिवसांच्या प्रवासात वारीने लोकांमध्ये एक नवीन चेतना निर्माण केली असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार या यात्रेद्वारे व्यापक प्रमाणात झाला आहे. “वारी प्रबोधनाची” च्या माध्यमातून तालुक्यातील जनतेमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.

.           यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक राष्ट्रीय कीर्तनकार इंजि. भाऊसाहेब थुटे, श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल चे संचालक रविदादा  मानव,  शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे युवा प्रबोधनकार राजदादा घुमनर, प्रज्वल टोंगे, प्रदीप चौधरी, दीपक नरताम, उदयपाल महाराज सुवर्णा प्रकाश पिंपळकर, दापत्य मधुकर बांदुरकर, मुरकुटे, नामदेव आसवले, एकनाथ चिकटे, त्यासोबत प्रत्येक केंद्रातील विशाल गावंडे, गुणवंत कुत्तरमारे, विनोद विधाते, लक्ष्मण देवतळे, संजय वाघाडे, चंदू शेडामे, करण नेवारे, सौरभ राणे, दयानंद जांभळे, विनोद रासेकर ,विजय दरेकर, रवी इंगोले, डॉ. उरकांडे इत्यादी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या वारीला सहकार्य केले.