सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

298
  • हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ
  • पती सह देराला अटक
  • बाळाची प्रकृती स्थिर 

वरोरा

.       वरोरा तालुक्यातील शेगांव बु येथील एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या 9 महिन्याच्या मुलाला विष पाजून स्वता गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. 28 ला घडली. मृतक महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पती व दिर यांच्या विरुद्ध कलम 304 ब 34 नुसार शेगांव पोलिसात गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

.            प्राप्त माहिती नुसार मृतक पल्लवी हिचा विवाह दि. 11 मे 2022 रोजी मौजा शेगाव येथील मितेश किशोर पारोधे यांचेशी झाला. पल्लवी च्या लग्नामध्ये मितेश परोधे याला त्याचे मागणीनुसार त्यांना साडेचार तोडे सोने दिले. लग्नानंतर दोन तिन महीणे तिचा नवरा यांनी पल्लवीला चांगले वागविले व त्यानंतर तिचा नवरा मितेशने आपल्या आई वडील व त्याच्या भावाच्या भडकावल्याने पल्लवीला शिवीगाळ करुन मारहाण करीत होता. मितेशला दारुचे फार व्यसन होते. परंतु लग्नापुर्वी आम्हास कोणतीही माहीती दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सन 2022 च्या दिवाळी सणाला पल्लवी माहेरी आली असता, तिने आपल्या आई वडिलांना संगितले की माझे पती मितेश व दिर सासरे, सासु हे तिला तुम्ही हुंड्यात पैसे दिले नाही, आम्हाला तु पाच लाख रुपये माहेरुन आणून दे असा तगादा लाऊन सतत शिवीगाळ व मारहाण करीत होते. त्यावेळी आम्ही आमचे जावई मितेश ला समजाउन सांगण्याचा प्रयत्न केला व आम्ही आमची मुलगी नांदायला पाठविली. परंतु तरीही माझी मुलगी दोन तिन महीण्यांनी फोन करुन तिला सासरचे लोकांकडुन होणाऱ्या छळाबद्दल माहीती देत होती. परंतु आम्ही संसारात छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात असे तिला सांगुण समजावत होते. त्यातच तिला एक मुलगा स्मित चा जन्म झाला. मुलाचे जन्मानंतर सुद्धा तिच्या सासरच्या लोकांकडुन छळ होत असल्याबद्दल ति आम्हास सांगायची. दि. 27 जून रोजी माझी बहीण सीमा कवडापुरे हिच्याकडे माझी मुलगी गेली होती व तिला सांगीतले होते की, माझे सासरचे लोक मला मानसीक व शारीरीक छळ करीत असुन मुलासह तु तुझ्या माहेरी निघुन जा असे म्हणत ती रडत होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 9.30 वा. च्या आसपास माझे सासरचे लोक खुप त्रास देत आहे असे म्हणून ति रडत होती. मी तिला वारंवार विचारत होती पण तिने फोन बंद केला व त्यानंतर सायंकाळी फोन आला व गाव माहीती मीळाली की, माझ्या मुलीने गळफास घेतल्याचा निरोप मिळाला. आम्ही सर्वजण त्यांचे घरी गेलो असता, माझी मुलगी मृत अवस्थेत आढळली. या संपुर्ण प्रकरणावरुन सर्व तिचा नवरा, दिर व सासू सासरे मिळून पैशाच्या मागणीवरुन तिला शिवीगाळ करुन तिच्यावर कौटुंबिक अत्याचार केला व तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवुत्त केले. त्यामुळे सर्व तिचा नवरा, दिर व सासू सासरे यांनी माझ्या मुलीला आत्महत्येस प्रद्रुवुत्त केल्याची तक्रार मृतक पल्लवीच्या आईने शेगांव पोलिसात दिली. या आधारे शेगांव पोलिस स्टेशन चे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पल्लवीचा नवरा, दिर व सासू सासरे यांच्या विरुद्ध कलम 304 ब 34 नुसार गुन्हा दाखल केला असून मृतक पल्लवीचा नवरा मितेश किशोर पारोधे व दिर रितेश किशोर पारोधे या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास शेगांव पोलिस करीत आहे.

 

बाळाची प्रकृती स्थिर 

.           सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या 9 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला विष पाजून स्वतचे जीवन पल्लवीने संपविले. मात्र चिमुकल्या स्मितची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. मानवटकर यांच्या देखरेखित स्मित वर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.