शिवसेनेच्या गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियानाला सुरुवात

28

जिल्हाप्रमुख जिवतोडे यांच्या हस्ते सोनेगाव (लोधी) येथे शाखेचे थाटात उद्घाटन

वरोरा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात गाव तिथे शाखा, गाव तिथे शिवसैनिक अभियान राबविण्यात येत आहे. यांची सुरुवात तालुक्यातील सोनेगाव (लोधी) येथे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यां नेतृत्वात शाखा फलकाचे थाटात उद्घाटन करून करण्यात आली आहे.

.      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्या आदेशाने जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम व विधानसभा संपर्क प्रमुख रितेश राहाटे यांच्या मार्गदर्शनात गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अभियानाअंतर्गत जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेला घरोघरी पोहचविण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील सोनेगाव (लोधी) गावात असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी सोबत घेऊन शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ढोल ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जय भवानी – जय शिवाजीच्या जयघोषाने गावपरिसर दणाणून सोडला होता. यानंतर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्तें शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

.      यावेळी जिल्हाप्रमुख जिवतोडे म्हणाले की, वरोरा – भद्रावती विधानसभेतील गावागावात शिवसेनेचा आवाज पोहचविण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक या अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य घरोघरी पोहचविण्याचे काम सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय शिवसेनेचे हे अभियान थांबणार नाही शेतकरी, शेतमजूर, तरुण बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आवाज उठवत राहील असे प्रतिपादन केले.

.      यावेळी गावच्या सरपंच तेजस्विनी बुऱ्हान, प्रदीप मत्ते, प्रकाश कुरेकार, सचिन बोढाले, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख गणेश चिडे, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख अक्षय झिले, मनीषा खारकर, ज्योती आसुटकर, शाखाप्रमुख रोशन खारकर, उपशाखा प्रमुख गणेश तोडासे, मधुकर लिल्हारे, महेश शेंडे, संकेत बुऱ्हान, निखिल आसुटकर, भूषण खारकर, प्रदीप लिल्हारे, मोनेश भोयर, विकास आसुटकर, विनोद गेडाम, अभय गजभे, रुपेश डहाळकर, भैय्याजी सहारे, पुरुषोत्तम ठाकरे, कवडू खारकर, मुकुल किनाके, आशिष धुर्वे, सुरेखा खारकर, अनिता सहारे, मनीषा आसुटकर, विद्या नन्नावरे, नम्रता ठाकरे, चेतन नन्नावरे आदी उपस्थित होते.