चिमूरातील २ आणि चंद्रपुरातील २ लाचखोर कर्मचारी एलसीबी च्या जाळ्यात

45

चंद्रपूर एलसीबीची कारवाई

एकाच दिवशी दोन ठिकाणी धाडी

चंद्रपूर : जिल्ह्यात लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज चंद्रपूर किंवा नागपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होताना दिसत आहे. मात्र लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. चंद्रपूर एलसीबीने एकाच दिवशी दोन ठिकाणी धाडी टाकल्या. यात चिमूर पंचायत समितीतील दोन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन लाचखोर कर्मचारी चंद्रपूर एलसीबी च्या जाळ्यात अडकले.

.       प्राप्त माहितीनुसार चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील तक्रारदार लाभार्थ्याला २०२२- २३ मध्ये शबरी योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. बांधकामासाठी चार टप्यात रक्कम मिळणार होती. त्यानुसार तक्रारदाराला ६५ हजार रुपये मिळाले. उर्वरित ४५ हजार व २० हजार रुपये खात्यावर जमा करून देण्यासाठी अभियंता मिलिंद वाढई याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून काम अडवून ठेवले होते. अखेर दहा हजार रुपये देण्याचा सौदा ठरला. मात्र, तक्रारदारास पैसे द्यायचे नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर पथकाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पथकाने पंचायत समिती परिसरात सापळा रचत चिमूर पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंता मिलिंद मधुकर वाढई (२७), आशिष कुशाब पेंदाम (२८, रा. देवरी) अभियंता वाढई याने दहा हजार
रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाच देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहन देणारे अभियंत्याचे मित्र आशिष पेंदाम यालाही पोलिसांनी अटक केली.

.       तर चंद्रपूर येथील घटनेत चंद्रपूर एसटी महामंडळात चालक असलेल्या तक्रारदाराचा सन २०२२ मध्ये बंगाली कॅम्प येथे अपघात झाला होता. सुट्या संपल्यानंतर त्यांना कामावर रुजू होण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रासह वैद्यकीय अहवालाची गरज होती. त्यामुळे त्यांनी जून २०२४ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अर्ज केला होता. परंतु, तक्रारदार वैद्यकीय अहवाल देण्यास टाळाटाळ करत होते. दरम्यान १८ जून रोजी वैद्यकीय अहवालासाठी दहा हजारांची लाच मागितली. बगुलकर यांची याबाबतची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १९ जून रोजी सापळा रचला. पडताळणीदरम्यान वरिष्ठ लिपिक दीपक सज्जनवार यांनी अशोक बगुलकर यांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहायक अशोक बाबुरावजी बगुलकर (५८) रा. चंद्रपूर, वरिष्ठ लिपिक दीपक केशवराव सज्जनवार या दोघांनाही अटक करण्यात आली.

.       ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जामभुलकर, सतीश सिडाम आदींनी केली.