हिरालाल लोया विद्यालयातील शशांक राडे अक्षरगौरव पुरस्कारने सन्मानित

29

वरोरा : माझी शाळा माझा फळा समूह व शिवाजी विद्यापीठ (संगीत व नाट्यशास्त्र विभाग) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन शिवाजी विद्यापीठात घेण्यात आले. या संमेलनात भारत शिक्षण संस्था द्वारा संचलित, हिरालाल लोया विद्यालय, वरोरा या शाळेतील सहाय्यक शिक्षक शशांक प्रभाकरराव राडे यांना ३-या अक्षरसंमेलनात “अक्षरगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यातआले.

.       यावेळी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलसचिव डॉ.व्हि.एन. शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

.       याप्रसंगी संमेलनाध्यक्ष तथा सहसचिव गृहविभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य व्यंकटेश भट, शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु दिगंबर शिर्के, राज्याच्या महसूल व वनविभागाचे सहसचिव संजय इंगळे, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, कोल्हापूर विद्यापीठाचे संगीत व नाट्यशास्त्र विभागप्रमुख ठाकुर देसाई आदी प्रमुख मान्यवर पाहुण्यांसह अक्षर संमेलनाचे संयोजक अमित भोरकडे, स्वागताध्यक्ष सतिश उपळाविकर व्यासपीठावर उपस्थित होते.

.       ३ -या अक्षरसंमेलनात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यभरातील सुलेखनकार, फलकलेखनकार व रांगोळीकार यांच्यामधून एकूण ३० कलाकारांना यावेळी राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.