अखेर चिमूर – गडचिरोली बस सेवा सुरू

25

सरपंच, पोलीस पाटील, गुरुदेव मंडळे व नागरिकांनी मानले आगरप्रमुखाचे आभार

नेरी : चिमूर आगारातून चिमूर – गडचिरोली ही बस सेवा प्रवाश्यांना सुरू करावी यासाठी नेरी शिरपूर बोथली अडेगाव लोहारा लावारी सोनापूर येणोली वैजापूर कोजबी येथील नागरिकांनी गुरुदेव सेवामडळाच्या पदाधिकारी गुरुदेव भक्त, पोलीस पाटील सरपंच विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक यांनी मागणी केली तश्या आशयाचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आले असता आगार प्रमुखाणी तात्काळ दखल घेत या मार्गाची तपासणी करुन घेतली बस सेवा सुरू केल्याने या मार्गावरील गावकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाला असून सर्वांनी एक दिलांनी आगार प्रमुखाचे आभार मानले आहे.

.      चिमूर गडचिरोली बस फेरी ही चिमूर नेरी शिरपूर बोथली सोनापूर येनोली वैजापूर कोजबी तळोधी गांगलवाडी आरमोरी मार्गे गडचिरोली सुरू करावी अशी मागणी या परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, गुरुदेवभक्त नागरिक विद्यार्थी यांनी केली होती. कारण या परिसरातुन गडचिरोली जाण्यासाठी एकही सरळ बससेवा नसल्याने मोठी कसरत करावी लागत असे शैक्षणिक वैधकिय किंवा इतर अनेक कामासाठी बससेवा नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असे तुटक तुटक प्रवास करावा लागत असल्याने वेळ खूप वाया जात असे किंवा मुक्काम टोकाला जात असल्याने दिवसे जात होती. त्यामुळे या मार्गावरील अनेक गावातील सरपंच, पोलीस पाटील, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी गुरुदेवभक्त नागरिकांनी आगार प्रमुखांना निवेदन सादर करून बस सेवेची मागणी केली. तेव्हा आगार प्रमुखांनी तात्काळ कारवाई करीत या मार्गाची चौकशी करून दि 12 जून पासून सकाळी आणि दुपारी अश्या दोन फेऱ्यात बस सेवा सुरू केल्याने या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी चिमूर आगारप्रमुखाचे मनापासून आभार मानले असून धन्यवाद दिले आहे.