जनावराच्या गोठ्याला भीषण आग २ बैल होरपळले

39

शॉर्ट सर्किट मुळे लागली आग

शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान

आसाळा येथील घटना

वरोरा : तालुक्यातील आसाळा येथील शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग लागून गोठ्यात बांधलेले बैल आगीने होरपळून २ बैल गंभीर जखमी झाले तर बैलाचा चारा, व शेतीचे अवजारे जळून खाक झाले. सदर आग शॉर्ट सर्किट मुळे रविवारी दुपारी २ वाजताचा दरम्यान घडली. शंकर डोमाजी गायकवाड असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

.      प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील आसाळा येथे शंकर गायकवाड याचे शेत आहे. गायकवाड यांनी शेतातच शेती उपयोगी साहित्य, जनावरांचा चारा व आपले जनावरे व वैरण ठेवण्यासाठी शेतात टीनाचा गोठा उभा केला होता. दिवसभर शेतीचे कामे आटोपून परत घरी आले त्यानंतर दुपारी घरी शेतातून आल्यानंतर शेतात बांधून ठेवलेला एक बैल दाव तोडून जळलेले अवस्थेत घरी आला तात्काळ शेतकऱ्यांनी शेतात जाऊन बघतो तर त्याच शेतात असलेल्या विद्युत ट्रांसफार्मर मध्ये बिघड आल्याने शॉर्ट होऊन आग लागली, या आगीमध्ये शेतातील ठेवलेल्या गोठ्यातील जनावराचे वैरण पूर्णपणे खाक झाले, तसेच त्या गोट्यात बांधलेले दोन बैल व एक गोरा पूर्णपणे आगीत जखमी झाले, तरी संबंधित वीज वितरण कंपनीकडून व्यवस्थित पंचेनामे करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. अशी मागणी विज वितरण कंपनी शाखा अभियंता प्रफुल खुडंसंगे यांना फोन वरून सर्व माहिती दिली आणि तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे आणि ग्रामस्थाणी केली आहे, ऐन शेती हंगामात शेतकऱ्यावर आलेल्या संकटात शेती कशी करायची हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

वीज वितरण कंपनीचा अलगर्जीपणा                                                                                                                                                                                                                                    वरोरा तालुक्यातील आसाळा शेत शिवारात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व वारा धुनीने शेतातील पोल, वीज वाहिन्या, ट्रान्सफर्मर पडले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीला एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिली होती. मात्र याकडे वीज वितरण कंपनीने कमालीचे दुर्लक्ष केले. वीज वितरण कंपनीच्या अलगर्जी पणाचा फटका शेतकऱ्यांना बसला. वेळीच यावर उपाययोजना केली असती तर जनावरे होरपडली नसती. आणि शेतकऱ्याचे नुकसान ही झाले नसते. वीज वितरण कंपनी ने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दयावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी केली आहे.