पावसाच्या तोंडावर गडचांदूरात अतिक्रमण हटाव मोहीम ?

37

नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभाराचा दुकानदारांना फटका

व्यापारीवर्गात असंतोष, मोहीम थांबविण्याची मागणी

गडचांदूर : औधोगिक नागरी गडचांदूर शहरातील वाढलेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी अनेक महिन्यापासूनची मागणी असताना सुद्धा या मागणीकडे नगरपरिषदेने कानाडोळा करून दिवस काढलेत, मात्र ऐन मान्सूनच्या आगमनातच, पावसाच्या तोंडावर गडचांदूर नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी काही दिवसापूर्वीच येथील दुकानदारांना नोटीस पाठविल्या आहे. असा नियोजन शून्य कारभार म्हणजे कळस असून त्यामुळे व्यापारी वर्गात असंतोष पसरला आहे.

.      अतिक्रम काढने हा गरजेचा भाग असला तरी नागरपरिषदने काढलेली वेळ चुकीची आहे, दुकानात पावसाचे पाणी येऊ नये यासाठी प्रत्येक दुकानदारांनी तात्पुरते शेड उभारले आहे, त्यामुळे काही प्रमाणात का होईना, मालाचे स्वरक्षण, पावसात ग्राहकांना, नागरिकांना उभे राहण्याची सोय होते, मात्र येत्या काही दिवसात नागरपरिषदने मोहीम राबविल्यास दुकानदाराची गैरसोय होऊन, पावसाचा फटका बसून नुसकांनहि होऊ शकते, त्यामुळे आधीच ऑनलाइनच्या कचाट्यात सापडलेल्या, मंदीच्या सावटाखाली वावरणाऱ्या छोट्या – छोट्या गरीब दुकानदारावर उपासमारीची पाडी येऊ शकते.

.      नगरपरिषदेला अतिक्रमण काढायचे असल्यास पावसाळा संपल्या नंतर, अतिक्रमण काढावे त्यासाठी आम्हीही सहकार्य करू मात्र पावसाच्या तोंडावर अतिक्रमण मोहीम राबहुन नगरपरिषदने आम्हाला त्रास देऊ नये अशी मागणी शहरातील दुकानदारांनी केली आहे.

अतिक्रमण काढण्यासाठी हि वेळ चुकीची                                                                                                                                                                                                                             पावसाला सुरवात होताच शहरातील प्रत्येक रस्त्यावर नाल्याचे दुर्गंधी युक्त पाणी साचून नागरिकांना मनस्थाप सहन करावा लागतो. तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, मान्सूनच्या तोंडावर नागरपरिषदने मान्सूनपूर्व नाले सफाई नाले सफाई मोहीम राबविणे गरजेचे असताना, नगरपरिषदने शहरातील अतिक्रमण पावसात काढण्यासाठी मोहीम राबविणे कितपत योग्य.                                                                                                                                    रोहन काकडे, युवा नेता भाजप