15 गावातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले सुसंस्काराचे धडे

70

कोलारी येथे श्रीगुरुदेव सुसंस्कार शिबिर संपन्न

भद्रावती : श्री. समर्थ एकनाथ महाराजांची पावन भुमी कोलारी येथे श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरी, श्री गुरुदेव सेवा मंडळ कोलारी व श्री संत एकनाथ महाराज संस्थान कोलारी चे वतीने स्व. जगन्नाथ गावंडे यांच्या प्रेरणेने, आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, ह.भ.प.मनोज महाराज चौबे यांचे मार्गदर्शनामध्ये सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने 15 गावातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले सुसंस्काराचे धडे.

.       देशाची भावी पिढी सुसंस्कारीत घडावी, योग्य वयापासूनच बाल मनावर चांगले विचार चांगल्या सवयी रुजवून त्यांच्या अंगी स्वयं शिस्त निर्माण करून संस्कारित आदर्श विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशातून श्री समर्थ एकनाथ महाराज देवस्थान चे परिसरातील भव्य सभागृहामध्ये श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर पार पडले. दिनांक २ जुन २०२४ पासुन सुरुवात झालेल्या सात दिवसीय सुसंस्कार शिबिरामध्ये कोलारी, चिचाळा, मेंढेगाव, भुयार, वाकर्ला, तरोडी, मेढा, सिर्सी नागपूर अशा १५ गावातील एकूण १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

.       सुसंस्कार शिबिराची सुरुवात सकाळी ५.३० वाजता प्रात: सामुदायिक ध्यानाने होऊन त्यानंतर आदर्श जीवनाची दिनचर्या, आत्मसंरक्षणाचे धडे,योगासने, कराटे, लाठीकाठी, मल्लखांब, बौद्धिक, संगीत व श्र्लोक पाठांतर, श्रीमद् भगवद्गीता संथा, टाळ पदन्यास, वक्तृत्व कला, शेवटी सामुदायिक प्रार्थनेने विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचा शेवट होउन पुढील दिनचर्येकरिता विद्यार्थ्यांना स्वगृही पाठवल्या जात असे शिबिरातील सामुदायिक प्रार्थना व ध्यानप्रसंगी संपूर्ण विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांची शिबिराला भेट विशेष आकर्षण ठरले.

.       आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात दीपासन व गुरुदेव हमारा प्यारा या संकल्प गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिबिरात शिकविलेल्या प्रशिक्षणाचे आकर्षक प्रात्यक्षिके सादर केले तसेच बालकांच्या मनोगताने हजारोच्या संख्येने उपस्थितांची मने जिंकली.

.       याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दयाराम चौधरी व प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण गमे, सतीश वाजुरकर, बळीराम गावंडे, डॉ. तराळ, लक्ष्मण राऊत, चिंतेश्वर चौधरी, परसराम ठाकरे, गुणवंत कुत्तरमारे, संदिप इंगोले, गजानन मिरे, विजय मिरे, सूर्यभान गावंडे, प्रज्वला गावंडे, राउत, दत्तू कडू, राजू कडू, रुपलाल कावळे, प्रल्हाद मिरे, गंगाधर कडू, मोहन कडू, रोशन ढोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विशाल गावंडे यांनी केले प्रास्ताविक अरविंद राऊत व आभार कार्तिक गावंडे यांनी मानले.

.       शिबिराच्या यशस्वीते करिता प्रशांत सोनटक्के, किशोर गावंडे,सुरज सोनटक्के, रोशन गावंडे, ऋषिकेश आमदरे, संदीप कडू, आदित्य पिंपलकर, संकेत गावंडे, आशिष गावंडे, तेजस ठाकरे, प्रदीप अलोणे, व गावकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.