शिंदे महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा

55

वरोरा : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक द्वारा संलग्नित नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

.      पाणी वाचवा जीवन वाचवा अशा घोषवाक्यखाली साजरा करण्यात आलेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे अनमोल महत्त्व व तप्त उन्हाळ्यात पाण्याची प्राणिमात्रांसाठी व पक्षांसाठी असणारी गरज यावर प्रकाश टाकला. प्राचार्य गुरुदेव जुमडे यांनी पाण्याचे महत्व विशद करताना भविष्यातील पिढी करिता या पृथ्वीवर आपल्याला पाणी वाचवायचे आहे हे आपले नैतिक कर्तव्य आहे याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन केले.

.      प्राध्यापिका सीमा बोभाटे यांनी विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना पाण्याचे जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. प्राध्यापक पियुष लांडगे यांनी वाढते जागतिक तापमान व पाण्याची घटत चाललेली पातळी व त्यावरील उपाय योजना याविषयी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्राध्यापिका प्रणाली नरड, प्राध्यापिका प्रीती पोहाणे, प्राध्यापक विशाल प्रसाद, दिव्या पेचे, इंदिरा निखाडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.