माजरी ग्रामपंचायत मध्ये शिवस्वराज्य सोहळा उत्साहात साजरा

33

माजरी : हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवरायांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा ग्रामपंचायत माजरीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.      शिवरायांचे लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्य दिन. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” ग्राम पंचायत कार्यालय माजरी येथे सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य आणि कर्मचारी व गावकरी अतिशय उत्साहाने सहभागी झाले.

.     दरम्यान सरपंच छाया जंगम, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गणवीर यांनी गुढी उभारूली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. या सोहळ्याविषयी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गणवीर यांनी माहिती सांगितली. छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवस्वराज्य दिन शासनाच्या सूचनेनुसार मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. हा शुभदिन असून महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुखसमृध्दीने भरली होती. आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस आता दरवर्षी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन सरपंच छाया जंगम यांनी केले.

.     यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनारकर, सुभाष मोहितकर, प्रवीण वैद्य, संगणक परिचलिका विजया रामटेके, सामाजिक कार्यकर्ते दिपक राम, पिंटू पचारे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.