ससा शिकार प्रकरणात सात जणांना अटक

140

बल्लारपूर वनक्षेत्राची कारवाई

उपचारा दरम्यान सदर सस्याचा मृत्यू

आरोपीकडून शिकारीचे साहित्य जप्त

कोठारी : बल्लारपूर वनक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमना अंतर्गत येत असलेल्या मौजा पळसगांव तेंदु गोडावुन परिसरात सस्यांची वाघरी लावुन शिकार करणार्‍या ७ जणांवर बल्लारपुर वनविभागाने वनगुन्हा अंतर्गत कारवाही केल्याचे घटना ५ जून ला उघडकीस आली.

.          प्राप्त माहिती नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना सस्याची शिकार होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. त्या माहितीचे आधारे पळसगांव येथील तेंदु गोडावुन मागील परिसरात सापडा रचुन आरोपी दिलीप रामा मेश्राम (३७) रा. गोंगले, तह. सडक अर्जुनी, जि.गोंदिया, राजु काशीराम मेश्राम (३९) रा.उमरी, तह.साकोली, जि.भंडारा, भोजराम शंकर कोल्हे (३४) रा.सोंदळ, तह.सडक अर्जुनी, जि.गोंदिया, विनोद रामकृष्ण बेंडवार (४२) रा.सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि.गोंदिया, सुभाष वासुदेव चन्ने (४४) रा. सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि.गोंदिया, पुरुषोत्तम मोतीराम वलथरे (४५) रा. किन्ही, तह.साकोली, जि. भंडारा, फागु पांडुरंग शेन्डे (५०) रा. किन्ही, तह. साकोली, जि. भंडारा यांना एक जिवंत ससा (जखमी अवस्थेत) व वन्यप्राणी शिकारीचे फासे सह ताब्यात घेतले व जखमी सस्याला उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान सदर ससा मृत पावला.

.          वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता आरोपींनी सस्याचे मास खाण्याकरीता शिकार केल्याची कबुली दिली. सर्व आरोपी विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २,९, ३९, ४४, ५१ व ५२ अन्वये प्राथमिक वनगुन्हा अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला व त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, बल्लारपुर येथे हजर करण्यात आले. वनविभागा मार्फत सरकारी वकील ऍडव्होकेट संगीता डोंगरे हे सदर प्रकरण पाहत आहे.

.          सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक, बी. टी. पुरी, वनरक्षक परमेश्वर आनकाडे, सुनिल नन्नावरे, मनोहर धाईत, भारती तिवाडे व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले.