विसापुरातील शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू

30

रुग्णालयात उपचारासाठी नेताना वाटेतच मालवली प्राणज्योत

दिवसभर रखरखत्या उन्हात शेतात केले काम

विसापूर : विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. अशातच पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांना रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता काम करावे लागत आहे. त्याने दिवसभर शेतात काम केले. काम करून घरी आला. घरी येताच त्याला अस्वस्थ वाटू लागले. घरच्यांनी त्याला उपचारासाठी दवाखाण्यात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डाक्टरांनी व्यक्त केला. ही घटना शनिवार (दि. १) रोजी सायंकाळी ८.४५ वाजता विसापूर येथे घडली. देवराव बालाजी टिकले (६२) रा. विसापूर, ता. बल्लारपूर असे उष्मघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

.      देवराव बालाजी टिकले व त्याचा मुलगा चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथील एका शेतात शनिवारी सकाळी कामाला गेले होते. तेथे दुपार पर्यंत रखरखत्या उन्हात बापलेकांनी काम केले. अशातच त्या ठिकाणी देवरावला अस्वस्थ वाटत होते. काम आटोपून दोघेही विसापूर येथे घरी आले. सायंकाळी ६ वाजता दरम्यान घरी आल्यावर त्याची प्रकृती खालावली. ते घरीच भोवळ येऊन पडले.

.      देवरावच्या मुलांनी तातडीने बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणावरून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे पुढील उपचारार्थ नेण्याचा सल्ला दिला. मात्र मुलांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. चंद्रपूरला उपचारासाठी नेत असताना वाटेतच देवराव चि प्राणज्योत मालवली. उष्माघाताने त्याचा बळी गेला. असे डाक्टरांचे म्हणने आहे.