अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत भटाळा येथे ईपीआरए संपन्न

33

वरोरा : वरोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील 25 ग्रामपंचायत मध्ये भारत रुलर लाईलिहूड फाऊंडेशन व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने अति प्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्प राबवण्यात येत आहे, त्यानुषगाने दिनांक 25/5/2024 ला ग्रामपंचायत भटाळा येथे ग्रामीण सहभागी मूल्यांकन करण्यात आले या पद्धती मध्ये गूगल मॅप वर गावातील 3 प्रकारचे नकाशे काढण्यात आले त्यात सामाजिक नकाशा, जमीन प्रकार नकाशा, जमीन उपयोग नकाशा हा गावाकर्यांच्या मार्गदर्शन खालील काढण्यात आले.

.        या प्रकल्प अंतर्गत माथा ते पायथा जलसंधरनाची कामे करून पाण्याचा स्तर वाढण्यात येणार आहे त्याच बरोबर मनरेगा अंतर्गत कामना गती देऊन सीमांत कुटूंब यांचे उत्पन्न वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत व उपजीविका यावर भर देण्यात येत आहे, याच एक भाग म्हणून ईपीआरए करण्यात आला व यात सर्व गावकरी यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व नकाशा पण चांगल्या प्रकारे समजून घेतला अशाच प्रकारे महालगाव, खेमजई येथे पण नकाशा काढण्यात आले व तिथे पण गावाकऱ्यांनी नकाशा समजून घेतला व आपल्या गावात काय काय आहे. आपली जमीन कशी आहे व कोणत्या प्रकारची आहे ही सर्व माहिती गावाकऱ्यांनी चांगल्या प्रकारे दिली व ईपीआरए संपन्न करण्यात आला.

.        यात भटाळा येथील उपसरपंच हरिदास जाधव, ग्रा.सदस्य माणिक जांभुळे, ग्रामरोजगार सेवक दिलीप तुमसरे व समस्थ गावकरी उपस्थित होते. त्याच बरोबर कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर चे टीम लीडर रोशन मानकर, कृषी तज्ञ डोये, जलतज्ञ श्रीपत पाटील, जुमडे, सीआरपी मंगेश तुमसरे, विशाल आडे, गुरूदास चौधरी, अंकुश रामपुरे, आचल घोडमारे, पल्लवी नन्नावरे, नीलिमा वनकर, माया पोहीणकर उपस्थित होते.