मनुस्मृती पुरस्कृत आराखडा रद्द करा

35

वंचित बहुजन आघाडीची मागणी

कोठारी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मनुस्मृतीचा पुरस्कार करणारा शैक्षणिक आराखडा जाहीर केला असून फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंकित करण्याच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. तेव्हा मनुस्मृती पुरस्कृत आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा.अश्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तालुका बल्लारपूर तर्फे शुक्रवारी तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

.         मनस्मृतीने देशातील नागरिकांना समतेचा अधिकार, महिलांचे स्वातंत्र्य, विकासाच्या संधी, नाकारल्या असल्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती चे दहन केले आज तेच मनुस्मृतीमधील श्लोकाच्या समावेश शैक्षणिक आराखड्यात होत असेल.

.         तर ही बाब विद्यार्थ्याकरिता मोठी गंभीर बाब आहे. सध्याच्या काळामध्ये प्रस्थापित सरकार च्या मार्फत शैक्षणिक आराखड्याच्या आडून राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मनुस्मृती लादून शिक्षण प्रणाली ही गोरगरिबांच्या मुलांना गुलामीच्या विषमतेमध्ये बांधणारी होय. याद्वारे देशाच्या भावी पिढीला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. तेव्हा सदर शैक्षणिक आराखडा रद्द करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्राच्या प्रत्येक चौकात मनुस्मृति दहन करण्यात येईल. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका कडून तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले.

.         यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी चे जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मधुकर उराडे व तसेच वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हा सल्लागार सत्यभामा भाले व वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य सुदेश शिंगाडे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष गोंडपिपरी प्रकाश तोहोगावकर प्रमुख उपस्थित होते, तसेच वंचित बहुजन महिला आघाडी तालुकाध्यक्ष नम्रता साव, तालुका संघटिका प्रज्ञा नमनकर, तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी एड. प्रवीण जानगे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष अभिलाष चूनारकर, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष ओम रायपुरे, रेखा पागडे वंचित बहुजन महिला आघाडी शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष प्रशांत सातकर, संघटक पराग जांभुळकर, धर्मेंद्र गायकवाड, देवराव नंदेश्वर, नंदा देशभ्रतार, पंचशीला वेले, प्रतिमा खेकारे, जितेंद्र करमणकर, शुभम सोनटक्के, स्वराज करमणकर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

.         सदर ठिकाणी दारू विक्री होत असल्याबाबत अद्यापही माहिती मिळाली नसून सदर बातमीच्या माध्यमाणे माहिती प्राप्त झाली आहे. विनोद राहांनडाले पोलीस निरीक्षक आरमोरी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई करण्यात येईल.