अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई

47

पुन्हा एकदा महिला कर्मचाऱ्यांची धडक कारवाई

2 महिन्यात लाखो रुपयाचा महसूल

शेकडो ब्रास रेती घरकुल धारकांना वितरित

वरोरा : अवैध रेती तस्कराविरुद्ध वरोरा महसूल विभागाने मोहीम उभारली आहे. दररोज अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती तस्कराविरुद्ध कारवाही केल्या जात आहे. शुक्रवारी दि. 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता मौजा खापरी परिसरात दोन ट्रॅक्टर वर कारवाही करून जप्त करण्यात आली. सदर कारवाही तहसीलदार वरोरा यांच्या मार्गदर्शनात महिला मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकांनी केली.

.          प्राप्त माहितीनुसार अवैध उत्खनन तपासणी करीता पोर्णीमा बदखल, विद्या केदार मंडळ अधिकारी, साखरा राजा, गीता अलाम, मंडळ अधिकारी, खांबाडा दौऱ्यावर असतांना सायंकाळी 7 वाजताचे सुमारास मौजा – खापरी गावाच्या परिसरात ट्रॅक्टर क्रं. MH-34-L-9373 व ट्रॅक्टर – MH-34 AP-0294 या वाहनातून 100 घनफुट (1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन किशोर बापुराव कुळसंगे व विठ्ठल देवतळे रा. खापरी ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे.

शासनाच्या तिजोरीचा व गरीब जनतेचा विचार करणारा पहिला अधिकारी                                                                                                                                                                                            रेती अभावी घरकुल योजना ठप्प झाली. अवैध रेती घरकुल धारकांना घेणे परवडत नाही. रेती अभावी कुणाचे घराचे बांधकाम थांबू नये. याकरिता वरोरा चे तहसीलदार योगेश कौटकर यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक निर्माण केले. पुरुष अधिकारी व कर्मचारी आणि महिला अधिकारी व कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून अवैध रेती साठा व अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरुद्ध मोहीम राबविल्या जात असुन या मोहिमेच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयाचा महसूल मिळत आहे तर गरिबांना घरकुल साठी मोफत रेती सुद्धा मिळत असल्याने तहसीलदार योगेश कौटकर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे. शासनाच्या तिजोरीचा व गरीब जनतेचा विचार करणारा पहिला अधिकारी असल्याचे ही आता नागरिकांत बोलल्या जात आहे.